Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 21:20 IST2020-07-01T21:18:55+5:302020-07-01T21:20:15+5:30
पोलिसांकडून होणाऱ्या सतत विचारपूस व चौकशीच्यादरम्यान सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिथानीने बुधवारी वांद्रे पोलिस स्टेशन गाठले.

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग आला आहे. पोलिसांकडून होणाऱ्या सतत विचारपूस व चौकशीच्यादरम्यान सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिथानीने बुधवारी वांद्रे पोलिस स्टेशन गाठले.सिद्धार्थ पिथानी सुशांतबरोबर त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता.
हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. त्यावेळी सिद्धार्थ पिथानी त्यांच्या घरी उपस्थित होता. सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी मुंबईच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आतापर्यंतच्या तपासात सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या आणि गुदमरल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु असे असूनही पोलीस या प्रकरणाचा सखोल चौकशी करीत आहेत.
अलीकडेच अभिनेत्री संजना सांघी यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. संजनाने सुशांतच्या 'दिल बेचार' या शेवटच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या प्रकरणात, YRF कास्टिंग डायरेक्टर आणि जलेबी स्टार अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह सर्वांची पोलिसांनी आतापर्यंत चौकशी केली आहे.
सुशांतने आत्महत्या केली नाही?
शेखर सुमन आणि रूपा गांगुली यांच्यासह असे अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार आहेत, जे सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या मानत नाहीत. रुपा गांगुली यांनी नुकतेच ट्विट केले होते आणि म्हटले होते की, कोणत्या आधारे सुशांतच्या घरावरुन आत्महत्येचे सुसाईट नोट सापडली नाही, कोणत्या आधारावर पोलिसांनी आत्महत्या जाहीर केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह
ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात
मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार
इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात