सुशांत सिंग राजपूतची हत्या कुत्र्याच्या बेल्टने करण्यात आली; माजी असिस्टेंटचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:59 IST2020-08-08T13:57:28+5:302020-08-08T13:59:34+5:30
सुशांत सिंग राजपूतचे वकील रिया चक्रवर्ती आणि अन्य लोकांवर जे आरोप करत आहे ते धक्कादायक आहेत. आता सुशांत राजपूतचा माजी सहकारी अंकित आचार्य यांनी खळबळजनक दावा केला आहे.

सुशांत सिंग राजपूतची हत्या कुत्र्याच्या बेल्टने करण्यात आली; माजी असिस्टेंटचा खळबळजनक दावा
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज वेगवेगळे वळण येणारी विधाने केली जात आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी सरकार कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे सीबीआयने याचा तपास करावा अशी मागणी केली जात होती, सीबीआयनेही या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.
सुशांत सिंग राजपूतचे वकील रिया चक्रवर्ती आणि अन्य लोकांवर जे आरोप करत आहे ते धक्कादायक आहेत. आता सुशांत राजपूतचा माजी सहकारी अंकित आचार्य यांनी खळबळजनक दावा केला आहे. अंकित हा व्यक्ती आहे जो सुशांतसोबत २४ तास राहत होता. मात्र रियाने त्याला कामावरुन काढून टाकलं. या अंकितने दावा केला आहे. तो हे प्रकरण सोडवू शकतो, सुशांत आत्महत्या करणार नाही तर त्याची हत्या झाली आहे असा आरोप त्याने केला आहे.
अंकित आचार्यनं म्हटलं आहे की, सुशांत आत्महत्या करु शकत नाही. मी सुशांत भैयाला चांगलं ओळखतो, ही आत्महत्या आहे यावर माझा विश्वास नाही. ही निश्चितच हत्या आहे. जर आपण मान्य केले ही आत्महत्या आहे मग सुशांतच्या गळ्याभोवती O मार्क कसा आला? जेव्हा कोणी आत्महत्या करतो त्याच्या गळ्याभोवती U शेप येतो, जर सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्याचे डोळे आणि जीभ बाहेर कशी आली नाही. सुशांत प्रकरणात असं काही झालं नाही, मग ही हत्याच आहे असा दावा त्याने केला आहे.
तसेच सुशांतच्या गळ्याभोवती निशाण कोणते आहे याबद्दल त्याने दावा केला की, हे निशाण सुशांत राजपूतच्या डॉग फजच्या बेल्टचं निशाण आहे, माझ्याकडे सुशांतच्या मृतदेहाचे फोटो आहेत, आरोपींनी त्या डॉगच्या बेल्टने सुशांतची गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करुन दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी गेल्याने मी आनंदी आहे. सुशांत राजपूतला न्याय मिळेल, दोषींना फाशी दिली जावी अशी मागणी अंकित आचार्यने केली आहे. अंकित आचार्य हा सुशांतचा एक्स असिस्टेंट आहे, जो सुशांतसोबतच राहत होता.