मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 02:20 PM2020-07-29T14:20:39+5:302020-07-29T14:22:34+5:30
मुंबई पोलीस या प्रकरणात कासव गतीने तपास करत आहेत आणि त्याचवेळी त्याच्या तपासाचा अँगल देखील त्या प्रकरणानुसार योग्य नाही.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला दीड महिना झाला असून अजून पोलीस तपास आणि चौकशी सुरु आहे. दरम्यान, एका वृत्त वाहिनीशी बोलताना राजपूत कुटुंबाचा वकील विकास सिंहने मुंबईपोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला आहे. विकास म्हणतात की, रविवारी (26 जुलै) एफआयआर दाखल केला असूनही अद्याप रियाविरोधात कारवाई का झाली नाही. तसेच मुंबई पोलीस या प्रकरणात कासव गतीने तपास करत आहेत आणि त्याचवेळी त्याच्या तपासाचा अँगल देखील त्या प्रकरणानुसार योग्य नाही.
विकास सिंह यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना असेही म्हटले आहे की, मुंबई पोलीस सुशांत सिंग राजपूत याच्या कुटूंबावर दबाव आणत आहेत आणि त्यांना मुंबईच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव घेण्यास सांगत आहेत. सोबतच मुंबई पोलीस सुशांतच्या कुटूंबावर बड्या चित्रपट निर्मात्यांचे नाव घेण्यासाठी दबाव आणत आहेत. आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब अद्याप पोलिसांच्या चौकशीबाहेर आहेत.
पुढे विकास म्हणाले की, एफआयआरनंतर ताबडतोब रिया चक्रवर्ती हिला अटक केली जाईल असे आम्हाला वाटले, परंतु तसे झाले नाही. तथापि, आम्हाला अजूनही आशा आहे की, मुंबई पोलिस लवकरच अटक करतील. या संपूर्ण प्रकरणात विनय तिवारी (एसपी सिटी, पाटणा) यांनी बिहार पोलिसांची टीमही मुंबईत दाखल झाली असून तपास करत असल्याचे सांगितले आहे. मुंबई पोलिसांना मदत करण्याच्या प्रश्नावर विनय तिवारी म्हणाले की, याची कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्यानुसार काम केले जात आहे.
अलीकडेच सुशांतचे वडील के के सिंह यांनी एफआयआर दाखल करून रिया आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुशांतचे वडील म्हणतात की, रियाने फक्त आपल्या मुलाची मानसिक स्थिती बिघडविली आणि ड्रग ओव्हरडोजही दिला. तसेच के के सिंह पुढे म्हणाले की, सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यात वर्ग करण्यात आले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री
खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार
Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत
निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का
बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या
संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या
माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये; तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या
फसवणुकीबरोबर आता RTI कार्यकर्ते रवींद्र बर्हाटे याच्यावर स्कुटर चोरीचा गुन्हा दाखल