सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:06 PM2020-08-13T15:06:10+5:302020-08-13T15:07:14+5:30
Sushant Singh Rajput Suicide : सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कुठेही आलेलं नाही, मीडिया नाव घेतेय, मोठा व्यक्तीचं नाव घेतलं की, कोणत्याही प्रकरणाला प्रसिद्धी मिळते. मोठ्या कुटुंबातील व्यक्तींची नाव घेवून सनसनाटी निर्माण केली जाते.
मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा सुशांत प्रकरणात आपलं मत मांडलं असून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कुठेच आदित्य ठाकरेंचं नाव नाही आलेलं असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणावरून शिवसेना कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही असं बोलून राऊतांनी खडसावलं आहे. सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य दिशेने करत आहेत. पुढील तपासासाठी सुशांतच्या कुटुंबियांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावं. असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव कुठेही आलेलं नाही, मीडिया नाव घेतेय, मोठा व्यक्तीचं नाव घेतलं की, कोणत्याही प्रकरणाला प्रसिद्धी मिळते. मोठ्या कुटुंबातील व्यक्तींची नाव घेवून सनसनाटी निर्माण केली जाते. तांत्रिक दृष्ट्या हा तपास सीबीआयकडे दाखल केला आह. तो बेकायदेशीर आहे. त्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. राज्यांच्या अधिकारांवर हे अतिक्रमण आहे.
बिहार पोलिसांनी गुन्हा नोंद करून बिहार सरकारने केंद्राकडे सीबीआय चौकशीसाठी घाईघाईने शिफारस करणं देखील बेकायदेशीर आहे. कायदा आणि व्यवस्था हा महाराष्ट्राचा विषय आहे. शिवसेना कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही. मुंबई पोलिसांना तपास करू द्या. त्याचप्रमाणे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास आहे. मात्र, सीबीआय चौकशीच्या मागणीला माझा विरोध नसल्याचा विधान पवार यांनी केलं होतं. यावर संजय राऊत म्हणले की, शरद पवार यांनी अशी भूमिका घेतल्यास त्यावर मिडियानं चिंता करायची गरज नाही. पवारांचे विधान निरर्थक नसते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी