"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 09:02 PM2020-08-03T21:02:49+5:302020-08-03T21:04:07+5:30
सुशांत संकटात असल्याबाबत २५ फेब्रुवारीला मी वांद्रे पोलिसांना कळवले होते असल्याचं त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये तपासावरून मतभेदाची भिंत निर्माण झाली आहे. या दरम्यान आता सुशांतचे वडील व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केला आहे. सुशांत संकटात असल्याबाबत २५ फेब्रुवारीला मी वांद्रे पोलिसांना कळवले होते असल्याचं त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. मात्र, मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी याबाबत खुलासा करत २५ फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार केली असल्याचं म्हटले आहे.
ओ. पी. सिंग (आयपीएस) हे सुशांतचे मेहुणे असून त्यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त (झोन - ९) यांना याबाबत व्हॉट्स अॅपद्वारे मेसेज केले होते. त्यावर पोलीस उपायुक्त (झोन - ९) यांनी सिंग यांना कॉल केला आणि या तपासासाठी किंवा कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार बंधनकारक असल्याने लेखी तक्रार देण्यास विनंती केली होती. मात्र. सिंग यांनी तोंडी तक्रारीवर तपास करण्यास कळवले. मात्र त्यावर झोन- ९ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी स्पष्टपणे लेखी तक्रारीशिवाय शक्य नसल्याचे कळवले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
सुशांतचे वडील के के सिंग यांनी या व्हि़डिओमध्ये म्हणाले की, 25 फेब्रुवारी रोजी सुशांत संकटात असल्याचे मी मुंबई पोलिसांना सांगितले होते. 14 जून रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मुंबई पोलिसांनी 25 फेब्रुवारीच्या तक्रारीत दिलेल्या नावांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मात्र त्याच्या मृत्यूच्या 40 दिवसांनंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर मी पाटण्यात एफआयआर दाखल केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाटणा आणि मुंबई पोलिसांतील मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
#WATCH: #SushantSinghRajput's father in a self-made video says, "On Feb 25, I informed Bandra Police that he's in danger. He died on June 14 & I asked them to act against people named in my Feb 25 complaint. No action taken even 40 days after his death. So I filed FIR in Patna." pic.twitter.com/tnn9XN1XlB
— ANI (@ANI) August 3, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा