Sushil Kumar arrest: सुशील कुमार अद्यापही फरारच; अटकेचे वृत्त पोलिसांनी फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 11:18 PM2021-05-22T23:18:54+5:302021-05-22T23:22:06+5:30
Sushil Kumar not arrested yet: ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती.
ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार (Sushil kumar) याला अटक केल्याच्या बातम्या खोट्या निघाल्या आहेत. राजधानीच्या उत्तरेला असलेल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर ज्युनिअर सुवर्णपदक विजेता मल्ल सागर राणा याच्या हत्येप्रकरणी आरोपी सुशील कुमार फरार आहे. त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनीदेखील या वृत्ताचे खंडण केले आहे. (Sushil kumar not arrested yet, he is absconding.)
ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती. पोलिसांचा ससेमिरा चुकवून अज्ञातस्थळी दडून बसलेल्या सुशीलचा शोध घेणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. याशिवाय सुशीलचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणाऱ्यास ५० हजारांचा रोख पुरस्कार दिला जाईल.
सुशील कुमारचा खाजगी सचिव अजय कुमारला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिल्ल्ली पोलिसांनी हरियाणा आणि पंजाबमध्ये यांना अटक करण्यासाठी छापे टाकले होते, अशी बातमी आली होती. मात्र दिल्ली पोलिसांच्या सरकारी वकिलाने याबाबत पोलिसांशी बोलून हे वृत्त खरे नसल्याचे म्हटले आहे.
सुशील कुमार हा मेरठ टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता. सुशील कुमार हा कारच्या पुढील सीटवर बसला होता. हे फुटेज 6 मे रोजीचे आहे. तर स्टेडिअममध्ये 4-5 मे दरम्यान खून झाला होता. पोलीस त्या कारचा शोध घेत आहेत. सुत्रांनुसार सुशील हरिद्वारच्या एका बाबाकडे मदत मागण्यासाठी गेला होता.