शिक्षक जळीत कांड प्रकरणातील संशयित आरोपी ताब्यात, पोलिसांकडून चौकशी

By नंदकिशोर नारे | Published: October 12, 2023 08:03 PM2023-10-12T20:03:18+5:302023-10-12T20:03:25+5:30

या घटनेत शिक्षकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपीस पोलिसांनी गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे.

Suspect accused in teacher burning incident detained, police questioning | शिक्षक जळीत कांड प्रकरणातील संशयित आरोपी ताब्यात, पोलिसांकडून चौकशी

शिक्षक जळीत कांड प्रकरणातील संशयित आरोपी ताब्यात, पोलिसांकडून चौकशी

वाशिम: मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कर्तव्यावर जात असलेल्या शिक्षकास जबर मारहाण करून ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून देण्याची घटना पो.स्टे.जऊळका हद्दीत घडली होती. या घटनेत शिक्षकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपीस पोलिसांनी गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे.

पो.स्टे.जऊळका हद्दीत ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.०० वाजताच्या दरम्यान मृतक दिलीप धोंडूजी सोनुने, (वय ४५ वर्षे), व्यवसाय - शिक्षक, रा.शेलू फाटा मालेगाव, ता. मालेगाव, जि.वाशिम हे त्यांच्या दुचाकीने मालेगाव येथून बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कर्तव्यावर जात असताना त्यांना अज्ञात आरोपींनी ग्राम कोल्ही शिवारात अडवत डोक्यावर मारहाण करून त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्ांना जिवतं पेटवून दिले होते. यामध्ये दिलीप धोंडूजी सोनुने यांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय, वाशिम येथे मृत्यू झाला.

मृतकाचे भाऊ अनिल धोंडूजी सोनुने, (वय ४९ वर्षे), रा. बाळखेड, ता. रिसोड, जि. वाशिम यांच्या फिर्यादीवरून पो.स्टे.जऊळका येथे अज्ञात आरोपींवर कलम ३०२, २०१ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या प्राथमिक तपासादरम्यान असे आढळून आले आहे कि, यातील मयत दिलीप धोंडूजी सोनुने याचा रामदास सोनुने यांच्यासोबत ग्राम बाळखेड, ता.रिसोड, जि.वाशिम येथील शेतीच्या मालकी हक्काबाबत वाद सुरू होता.

त्या अनुषंगाने रामदास सोनुने यांचा मुलगा संशयित आरोपी ज्ञानेश्वर रामदास सोनुने याला पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस वि. न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. तसेच तांत्रिक पुरावे व मागील वादाचे वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तपास पो.स्टे.जऊळकाचे प्रभारी अधिकारी सपोनि. प्रदीपकुमार राठोड व तपास पथक करत आहे.
 

Web Title: Suspect accused in teacher burning incident detained, police questioning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.