गोमांस खाल्ल्याचा संशय! गोरक्षकांनी परप्रांतीय मजुराचा जीवच घेतला; कुठे घडली घटना?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 04:02 PM2024-08-31T16:02:02+5:302024-08-31T16:06:43+5:30

Mob Lynching Latest News : तथाकथित गोरक्षकांनी एका परप्रांतीय मजुराला गोमांस खाल्ल्याच्या संशयातून पकडले. नंतर त्याचा जीव जाईपर्यंत मारत राहिले. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केले.

Suspect of eating beef! The cow vigilantes took the life of the migrant labourer; Where did the incident happen? | गोमांस खाल्ल्याचा संशय! गोरक्षकांनी परप्रांतीय मजुराचा जीवच घेतला; कुठे घडली घटना?

गोमांस खाल्ल्याचा संशय! गोरक्षकांनी परप्रांतीय मजुराचा जीवच घेतला; कुठे घडली घटना?

Gaurakshak Killed Migrant Worker : गोमांस खाल्ल्याच्या संशयातून गोरक्षकांनी एका परप्रांतीय मजुराला बेदम मारहाण करत हत्या केल्याची उघडीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गोरक्षक गटाच्या पाच जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

पोलिसांच्या माहितीनुसार, हरियाणातील चरखी-दादरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शनिवारी पोलिसांना माहिती मिळाली की, गोमांस खाल्ल्याच्या संशयातून दोन परप्रांतीय मजुरांना बेदम मारहाण करण्यात आली. मजूर पश्चिम बंगालमधील असून, एकाचा मृत्यू झाला आहे. 

गोरक्षक गटाच्या पाच जणांना अटक

गोरक्षकांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मजुराचे नाव साबीर मलिक असे आहे. एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोरक्षक गटाच्या पाच लोकांना अटक केली आहे. २७ ऑगस्ट रोजी साबीर मलिकची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. 

प्लास्टिक बॉटल विकण्याच्या बहाण्याने बोलवून घेतले अन्...

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या गोरक्षकांनी मजुरांना मारहाण केली. त्यांना मजुरांनी गोमांस खाल्ल्याचा संशय होता. अभिषेक, मोहित, रविंदर, कमलजीत आणि साहिल अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी मृत्यू झालेल्या साबीर मलिकला रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल विकण्याचे कारण सांगून एका दुकानावर बोलवून घेतले. त्यानंतर लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. 

मजुरांच्या हत्या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग

आरोपी साबीर मलिकला मारायला लागले, तेव्हा काही लोकांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर आरोपी त्याला दुसर्‍या ठिकाणी घेऊन गेले. तिथे जबर मार दिला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश असून, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Web Title: Suspect of eating beef! The cow vigilantes took the life of the migrant labourer; Where did the incident happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.