पोलिसांच्या हातावर दिली तुरी; सांगली कारागृहातून खूनातील संशयित आरोपी पळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 02:07 PM2022-07-31T14:07:04+5:302022-07-31T14:09:08+5:30

Crime News : तासगाव खून प्रकरणांत होत जेलमध्ये, रविवारी सकाळी सव्वा सात वाजता पळ

Suspected accused in the murder escaped from Sangli Jail | पोलिसांच्या हातावर दिली तुरी; सांगली कारागृहातून खूनातील संशयित आरोपी पळाला

पोलिसांच्या हातावर दिली तुरी; सांगली कारागृहातून खूनातील संशयित आरोपी पळाला

googlenewsNext

सांगली : तासगाव येथील जेसीबी मालकाचा खून करणारा संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड (रा. येळगोड ता. सिंदगी जि. विजापूर) याने रविवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास जिल्हा कारागृहातून पळ काढला. त्याबाबत कारागृह प्रशासनाने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सुनील राठोड हा जेसीबी मालक हरी येडुपल पाटील (रा. मंगसुळी) यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. मालक हरी पाटील यांनी सुनील याची पत्नी पार्वती हिच्या अंगावर हात टाकला होता. त्यामुळे चिडून जावून सुनील आणि त्याच्या पत्नीने ८ जून २०२१ रोजी जेसीबी मालक हरी पाटील याचा निर्घुण खून केला. पाटील याचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत घालून तो विहिरीत टाकला. या प्रकरणांचा तपास तत्कालिन स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने  केला. खूनानंतर सुनील आणि त्याची पत्नी पार्वती हे दोघे जेसीबीसह पुण्याकडे निघाले होते. पोलिसांनी या दोघाना पुणे हद्दीतून अटक केली होती. सुनील हा सांगली कारागृहात जेरबंद आहे. रविवारी सकाळी त्याने कारागृहातून पळ काढला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्याकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.

Web Title: Suspected accused in the murder escaped from Sangli Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.