लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 02:38 PM2020-04-24T14:38:21+5:302020-04-24T14:39:58+5:30

४० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर पोलीस तपास सुरु, मृत्यूचे कारण अस्पष्ट

Suspected death of a man who came out from a house in a lockdown pda | लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Next
ठळक मुद्दे कल्याणच्या बंदरपाडा परिसरात राहणारे गणेश गुप्ता (४०) सकाळी १०.३० च्या सुमारास रेशन घेऊन घराच्या दिशेने जात होते.कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे.

कल्याण : लॉकडाउन काळात कोरोनाला पळवून लावण्यासाठी सर्वांना घराबाहेर पडू नये असे आवाहान वारंवार केले जात आहे. तरी देखील अनेकजण काही ना काही कारणे सांगून घराबाहेर पडून कोरोनाला निमंत्रण देत आहेत. कल्याणमध्ये घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. ४० वर्षीय व्यक्ती गटारात पडली आणि रुग्णालयात दाखल केले असते मृत घोषित करण्यात आले. या घटनेचा तपास खडकपाडा पोलीस   असून याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

कल्याणच्या बंदरपाडा परिसरात राहणारे गणेश गुप्ता (४०) सकाळी १०.३० च्या सुमारास रेशन घेऊन घराच्या दिशेने जात होते. त्याने सायकल एका ठिकाणी उभी केली. त्यांना कशाचातरी त्रास होत होता, त्यामुळे गणेश एका ठिकाणी बसले. ज्या ठिकाणी गणेश बसले होते त्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्या परिसरात बसण्याचे कारण विचारले. गणेशवर समोरील व्यक्तीने संशय घेतला तो कोणाला बोलविण्यासाठी गेल्याने गणेशने तेथून पळ काढला. पळत असताना काही अंतरावर गणेश एका गटारात पडले. आसपासच्या लोकांनी त्यांना त्यांच्या घरी नेले. मात्र, त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. काहीचे असे म्हणणे आहे की, गणेश खोकल्याने काही लोकांनी त्यांना मारहाण केली या मारहाणीनंतर घाबरलेल्या गणेशचा मृत्यू झाला आहे. मात्र, या घटनेचा सीसीटिव्ही समोर आले आहे, ज्यामध्ये गणेश एका व्यक्तीसमोर चर्चा करताना आणि नंतर पळताना दिसत आहेत. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे.

Web Title: Suspected death of a man who came out from a house in a lockdown pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.