आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 11:41 PM2020-08-31T23:41:14+5:302020-08-31T23:41:52+5:30
तपास यंत्रणेने ताहिरच्या सहा दिवसांची कोठडी कोर्टाकडून मिळविली आहे.
आम आदमी पक्षाचे (आप) चे निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन यांना फेब्रुवारीमध्ये ईशान्य दिल्लीत हिंसाचाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी अटक केली.
तपास यंत्रणेने ताहिरच्या सहा दिवसांची कोठडी कोर्टाकडून मिळविली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत सीएएविरोधी (नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा) निषेध आणि मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) च्या चौकशीच्या संदर्भात हुसेन याला अटक करण्यात आली होती. . यापूर्वी एजन्सीने उत्तरपूर्वी दिल्लीतील दंगली आणि तबलीघी जमात प्रमुख मौलाना साद यांच्याशी संबंध ठेवल्याप्रकरणी तिहार तुरुंगातून चौकशीसाठी ताहिरला आणले होते. दक्षिण दिल्लीच्या खान मार्केट भागातील कारागृहातून ईडीच्या मुख्यालयात ताहिरला आणण्यात आले होते.
ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली दंगलीसाठी आर्थिक मदत देण्याबाबतही ताहिरची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. दंगलीसाठी पैसे वसूल करण्यासाठी कोणत्या हवाला ऑपरेटरच्या संपर्कात होते, अशीही त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. फेब्रुवारीमध्ये ईशान्य दिल्लीतील दंगलीच्या संदर्भात हुसेन याला अटक करण्यात आली होती. दंगलींशी संबंधित कट रचल्याप्रकरणी बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tahir Hussain has been arrested by ED in connection with ongoing PMLA investigation into his role in money laundering and funding of anti-CAA protests and organizing riots in North-East Delhi during February 2020: Enforcement Directorate https://t.co/Lxxa8rMcxm
— ANI (@ANI) August 31, 2020