पत्नीची हत्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याचे केले निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 07:05 PM2020-07-31T19:05:47+5:302020-07-31T19:06:16+5:30
डॉ.उगले यांनी गुरुवारी नरेंद्र सोनवणे याच्या निलंबनाचे आदेश काढले. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
जळगाव : पत्नीचा मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेला कॉन्स्टेबल नरेंद्र भगवान सोनवणे याला पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे. आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाऱ्या सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा १० जुलै रोजी पहाटे जळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रथम पती पोलीस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द १३ जुलै रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर चौकशी होऊन या गुन्ह्यात २३ जुलै रोजी खुन व हुंडाबळीचे कलम वाढविण्यात आले होते. त्याबाबतचा कसूरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार डॉ.उगले यांनी गुरुवारी नरेंद्र सोनवणे याच्या निलंबनाचे आदेश काढले. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...
रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल