लाच प्रकरण: सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळेसह पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटीलचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:32 PM2023-10-14T23:32:55+5:302023-10-14T23:33:08+5:30
शुक्रवारी रात्री उशिरा पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले
सावंतवाडी : फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपीकडूनच लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांच्यासह गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील याला शुक्रवारी रात्री उशिरा पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणातील संशयित सुरज पाटील याच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा न झाल्याने जिल्हा रूग्णालयातच दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे त्याच्यावर अद्याप अटकेची कारवाई केली नाही.
तीन दिवसापूर्वी रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे याला एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते.तर यातील संशयित पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील हा रूग्णालयात आहे त्यामुळे त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच खंडागळे याला शुक्रवारी न्यायालयात हजर केल असता तीन दिवस पोलिस कोठडीत सुनावली आहे.तर पाटील यांची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे.आता या दोघांनाही पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत चे आदेश शुक्रवारी रात्री पोलिस विभागाकडून काढण्यात आले आहेत.हे आदेश सावंतवाडी पोलीस ठाण्याला ही प्राप्त झाले आहेत.
सावंतवाडी पोलिस निरीक्षक सुट्टीवरून परतले
दरम्यान या घटना कालावधीत मुंबई येथे कामानिमित्त गेले असलेले पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे शनिवारी हजर झाले असून दोडामार्ग पोलिस निरीक्षकांकडून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.