धारावीतील संशयित दहशतवाद्यांच्या पत्नीच्या मनात चुकचुकलेली संशयाची पाल     

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:54 PM2021-09-15T13:54:20+5:302021-09-15T13:57:15+5:30

Jan mohammad Shaikh : जान मोहम्मद शेखच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याच्या पत्नीने पोलिसांकडे  महत्त्वाची महत्वाचा खुलासा केला आहे. 

Suspicion lingers in the mind of the wife of a suspected terrorist in Dharavi | धारावीतील संशयित दहशतवाद्यांच्या पत्नीच्या मनात चुकचुकलेली संशयाची पाल     

धारावीतील संशयित दहशतवाद्यांच्या पत्नीच्या मनात चुकचुकलेली संशयाची पाल     

googlenewsNext
ठळक मुद्दे पत्नीला पतीच्या अचानक जाण्यावर संशय आल्यावर त्याने मोबाईलमध्ये तिकीट दाखवले. मात्र, पत्नी आणखी काही विचारण्याआधी त्याने घाईघाईने कपडे बॅगेमध्ये भरले आणि सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, अशी माहिती जान मोहम्मदच्या पत्नीने दिल्याचे पोलिसा

दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्लीपोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केली.  अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एक मुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं असून तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात राहतो. जान मोहम्मद शेखच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याच्या पत्नीने पोलिसांकडे  महत्त्वाची महत्वाचा खुलासा केला आहे. 

शेख हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता असा खुलासा झालाय. जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचीही धारावी पोलीस ठाण्यात बसवून चौकशी केली. “जान मोहम्मदने काही दिवस वाहनचालक म्हणून काम केले, त्यानंतर त्याने कुरिअर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जान सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत होता. अचानक घरी आला आणि त्याने काही मित्रांसह उत्तर प्रदेशला जात आहे” अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली. पत्नीला पतीच्या अचानक जाण्यावर संशय आल्यावर त्याने मोबाईलमध्ये तिकीट दाखवले. मात्र, पत्नी आणखी काही विचारण्याआधी त्याने घाईघाईने कपडे बॅगेमध्ये भरले आणि सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, अशी माहिती जान मोहम्मदच्या पत्नीने दिल्याचे पोलिसांनी सांगितलं.

जान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितले की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला १२ सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्हाला त्याच्या अटकेबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, अशी प्रतिक्रिया हुसैन यांनी दिली.

फय्याज यांनी सांगितलं की, त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती जाणून घेतली. १३ तारखेला जान मोहम्मदने आपल्याला फोन केला होता, पण दोघेही बोलू शकले नव्हते, असंही फय्याज यांनी पोलिसांना सांगितलं.

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. ६ संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. याचाच फायदा घेऊन अनेक ठिकाणी झालेल्या गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याचा दहशतवादी कट असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र दहशतवादी पथकाची  आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून यात धारावीतील संशयित आरोपी जान मोहमम्मद शेखबद्दल मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. 

Read in English

Web Title: Suspicion lingers in the mind of the wife of a suspected terrorist in Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.