पत्नी आणि मित्रामध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय, रागाच्या भरात उचलले 'हे' पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:01 PM2022-04-04T17:01:28+5:302022-04-04T17:02:14+5:30
Murder Case : दोन्ही आरोपी हे मृताचे जवळचे होते. आरोपींनी मृताची चाकूने 10 वार करून हत्या केली होती.
बांसवाडा : राजस्थानच्या बांसवाडा पोलिसांनी ६ दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येचा खुलासा केला आहे. पोलिसांनी हत्येतील दोन आरोपींना जयपूर येथून अटक केली. दोन्ही आरोपी हे मृताचे जवळचे होते. आरोपींनी मृताची चाकूने 10 वार करून हत्या केली होती.
बांसवाडा शहरातील अंबावाडी परिसरात गेल्या २९ मार्चच्या रात्री घडलेल्या खून प्रकरणाचा खुलासा कोतवाली पोलीस ठाण्याकडून करण्यात आला आहे. कालिका माता परिसरात राहणारा अजय आणि त्याच्यासोबत काम करणारा मित्र राज सिंगचा यांना इंदिरा कॉलनीत राहणारा २४ वर्षीय समीर खान याच्या हत्येप्रकरणी जयपूर येथून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजयला समीर आणि त्याच्या पत्नीमध्ये संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने साथीदारासह हा गुन्हा केला. आरोपींनी मृताच्या अंगावर 10 वार करून त्याची हत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या चष्म्याच्या आधारे पोलिसांना या आरोपींचा सुगावा लागला. पोलिसांनी चष्म्याबाबत चौकशी सुरू केली असता तो अजय भोईचा असल्याचे उघड झाले, त्यानंतर पोलीस अजयच्या घरी गेले असता तो तेथे आढळून आला नाही तर त्याचा मित्र राजसिंगही बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला, पोलिसांचे एक पथक गुजरातला गेले, तेव्हा आरोपी जयपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली.
तेथे आरोपींनी ऑटोचालकाकडून मोबाईल घेऊन बांसवाडा येथील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्याचा पत्ता बांसवाडा पोलिसांना लागला, पोलिसांनी ऑटो चालकाशी संपर्क साधून जयपूर पोलिसांना माहिती दिली आणि दोन्ही आरोपींना जयपूर येथून अटक केली. एसपी राजेश कुमार मीना आणि डीएसपी सूर्यवीर सिंह राठोड यांच्या निर्देशानुसार कोतवाली पोलिस स्टेशनचे अधिकारी रतन सिंह चौहान यांनी हा संपूर्ण खुलासा केला आहे.
राजेश कुमार मीना, एसपी बन्सवारा यांनी सांगितले की, 29 मार्चच्या रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात 1 व्यक्तीचा खून झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच आमची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली, आम्ही मृताची ओळख पटवली. मृत समीर अन्सारी हा मूळचा यूपीचा असून गेल्या 10 वर्षांपासून येथे काम करत होता. मग टीम तयार करून सर्वत्र शोध सुरू केला. घटनास्थळी सापडलेल्या चष्म्याच्या आधारे आम्ही आरोपींना ताब्यात घेतले. जयपूर पोलिसांच्या मदतीने अजय आणि मित्र राज सिंग यांना अटक करण्यात आली. आरोपी अजय आणि मृत यांच्यातील परस्पर वैर या हत्येचे कारण ठरले.