रेल्वे स्टेशनजवळ सापडली बॅटरीसह संशयास्पद बॅग, तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली अशी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:04 PM2021-07-21T16:04:56+5:302021-07-21T17:49:07+5:30

Battery and suspicious bag found near sultanpur railway station : बॅगच्या आत सापडलेल्या कागदपत्रांनुसार ती कानपूर जिल्ह्यातील पनकी येथे तैनात निलंबित कॉन्स्टेबलची आहे.

Suspicious bag with battery found near railway station, information given by investigating police ... | रेल्वे स्टेशनजवळ सापडली बॅटरीसह संशयास्पद बॅग, तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली अशी माहिती...

रेल्वे स्टेशनजवळ सापडली बॅटरीसह संशयास्पद बॅग, तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली अशी माहिती...

Next
ठळक मुद्देपोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुलतानपूर - बुधवारी पहाटे लोकेशनल जंक्शन स्टेशनच्या परिसराबाहेर गोंधळ उडाला आणि संशयास्पद बॅगेत बॅटरी व वायर सापडल्या. या माहितीवरून सक्रिय झालेल्या पोलिसांनी अयोध्या जिल्ह्यातून बॉम्ब नाशक आणि शोधक पथकाला पाचारण करून चौकशी केली. जेव्हा बॉम्ब नाशक आणि शोधक पथकाने बॅटरी आणि वायर वेगळे केले. तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, बॅगेत कोणतेही स्फोटक साहित्य आढळले नाही. बॅगच्या आत सापडलेल्या कागदपत्रांनुसार ती कानपूर जिल्ह्यातील पनकी येथे तैनात निलंबित कॉन्स्टेबलची आहे. पोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

एसपी डॉ.विपीन कुमार मिश्रा म्हणाले की, सकाळी स्टेशनच्या परिसराबाहेर एक अज्ञात बॅग पडल्याचे समजले. माहिती मिळताच पोलिस सक्रिय करण्यात आले, स्टेशनच्या बाहेरील परिसरात शोधकार्य सुरू करण्यात आले. आरक्षण केंद्राजवळ बॅग पाहून पोलिसांनी घेराव घातला आणि लोकांना तेथून दूर जाण्यास सांगितले. बॅग काळजीपूर्वक तपासल्यानंतर त्यामध्ये बॅटरी व वायर सापडल्या. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी बॉम्ब नाशक आणि शोधक पथकाला पाचारण केले. तपासणीनंतर पथकाने बॅटरी आणि वायर अलग केले. बॅगेत कोणतीही अन्य आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही असे एसपी म्हणाले.

बॅगच्या आत एक पासबुक सापडले, ज्यामध्ये नरेंद्र सिंह यांचे नाव लिहिलेले आहे. ते पासबुक कानपूरमधील एका हवालदाराचे असल्याचे समजले. त्याला तीन वर्षांपासून निलंबित करण्यात आले आहे. अधिकारी फोनवर त्याच्याशी बोलले तेव्हा तो परवानगीशिवाय आपल्या घरी गेला असल्याचे आढळले. त्याने सांगितले की, बॅगमध्ये बॅटरी व वायर कसे आले हे माहित नाही. सध्या पोलीस याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. 


अनुचित घटना घडविण्याचा कोणताही हेतू नव्हता

पोलीस संदीपकुमार राय यांनी कोणतेही स्फोटक साहित्य न मिळाल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडविण्याचा हेतू नव्हता असे सांगितले आहे. काही अंतरावर पार्किंगही वाहनांनी भरलेली होती. एखाद्या स्फोटामुळे मोठी विध्वंस होऊ शकला असता. सध्या पोलिस प्रत्येक कान्याकोपऱ्यातून या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

Web Title: Suspicious bag with battery found near railway station, information given by investigating police ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.