२२ वर्षीय योगा विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; आईला अखेरचा व्हिडीओ कॉल केला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:35 PM2022-02-08T19:35:15+5:302022-02-08T19:35:48+5:30
शनिवारी रात्री आनंद गेस्ट हाऊसच्या बाहेर पडला नाही. सोमवारी रात्री इटारसी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदला कॉल केला. परंतु काहीच उत्तर आलं नाही.
भोपाळ – शहरातील तुलसी नगर स्थित संस्कार भारतच्या गेस्ट हाऊसमध्ये योगा विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. शनिवारी रात्री मृत युवकानं त्याच्या आईला अखेरचा व्हिडीओ कॉल केला होता. रविवारी तो गेस्ट हाऊसबाहेर निघालाच नाही. सोमवारीही कुणाला दिसला नाही. रात्री दीडच्या सुमारास जेव्हा इटारसी संघाचे २ पदाधिकारी गेस्ट हाऊसला पोहचले तेव्हा त्यांना युवकाचा मृत्यू झाल्याचं कळालं.
शॉर्ट पीएममध्ये विष प्यायल्याने मृत्यू झाल्याचा संशय वर्तवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार युवकाच्या पोटात क्लॉटिंग आढळलं आहे. विसरा रिपोर्टसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय आनंद त्रिपाठी बरकत उल्ला विश्वविद्यालयात योगा विषयात पीजी कोर्स करत होता. हा युवक सतना जिल्ह्यातील जैतवारा डगडिहा येथे राहणारा होता. भोपाळच्या तुलसीनगर भागात संस्कार भारती येथे तो वास्तव्यास होता.
शनिवारी रात्री आनंद गेस्ट हाऊसच्या बाहेर पडला नाही. सोमवारी रात्री इटारसी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदला कॉल केला. परंतु काहीच उत्तर आलं नाही. याबाबत संस्कार भारतीची देखभाल करणारे प्रमुख यांना कळवण्यात आले. तेव्हा तात्काळ खोलीचा पाठिमागचा दरवाजाला धक्का देत आत पाहा असं ते म्हणाले. संघाच्या २ पदाधिकाऱ्यांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा आनंद बेडवर पडलेल्या अवस्थेत होता. त्याने चादर घेतली होती. आवाज दिल्यानंतरही शरीराची हालचाल झाली नाही. त्यानंतर दोघांनी चादर काढून पाहिली तेव्हा आनंद बेशुद्ध अवस्थेत असल्याचं दिसून आले. शरीर थंड पडल्याचं आढळलं.
घटनास्थळी पोलीस पोहचले
आनंदची अवस्था पाहून दोघंही पदाधिकारी भयभीत झाले. त्यांनी पोलिसांच्या गाडीला जाताना पाहिले आणि तात्काळ आवाज देत गाडी थांबवली. त्यात असिस्टेंट सीपी उमेश तिवारी गश्त घालत होते. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तोपर्यंत उशीर झाला होता. मंगळवारी सकाळी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आनंदच्या शरीरात क्लॉटिंग आढळली. विषामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. परंतु विसरा रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहे. मात्र युवकाच्या संशयास्पद मृत्यूमुळे नेमकं हे का आणि कुणी घडवलं हे शोधणं मोठं आव्हान आहे.