एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, सगळेच हादरले, पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 04:45 PM2022-04-16T16:45:53+5:302022-04-16T16:46:01+5:30

राहुलचा मृतदेह घरच्या अंगणात लटकलेल्या अवस्थेत होता तर पत्नी आणि लहान मुलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडल्याचं दिसून आले.

Suspicious death of 5 members of the same family at Prayagraj UP | एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, सगळेच हादरले, पोलीसही हैराण

एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, सगळेच हादरले, पोलीसही हैराण

googlenewsNext

प्रयागराज – नवाबगंजच्या खागलपूर गावात घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळला. आता त्याला वेगळं वळण आले आहे. घटनेच्या रात्री एकही बाहेरचा व्यक्ती घरात आला नाही. त्यामुळे आता संशयाची सुई घराच्या अंगणात मृत अवस्थेत लटकणाऱ्या राहुल याच्यावर जाते. पोलीस सध्या सर्व बाजूने तपास करत आहेत. कुटुंबातील ५ जणांच्या संशयास्पद मृत्यूने सगळेच हादरले आहेत.

पोलीस तपासात आता एका खोलीत सुसाईड नोट आढळली आहे. जी राहुल याने लिहिल्याचं समोर आले आहे. राहुलने  मृत्यूसाठी जबाबदार सासरच्या ११ मंडळींना धरलं आहे. नोव्हेंबर २०२१ पासून राहुल तिवारी भागलपूर गावात कुटुंबासह राहत होता. तो मूळचा कौशांबीचा आहे. रात्री उशीरा राहुल तिवारी कुटुंबासह जेवण करून झोपला होता. मृतकाचे कुटुंब ज्याठिकाणी राहत होते तेथील शेजारील व्यक्तीने घरातील कुणीच सकाळी बाहेर निघालं नाही म्हणून आत डोकावून पाहिले तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला.

राहुलचा मृतदेह घरच्या अंगणात लटकलेल्या अवस्थेत होता तर पत्नी आणि लहान मुलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात खोलीत पडल्याचं दिसून आले. या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. ५ लोकांच्या संशयास्पद मृत्यूने सगळे गावकरी भयभीत झालेत. या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जर आरोपीने ४ लोकांची हत्या केली तर राहुलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत कसा सापडला? त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सर्व अँगलनं विचार करत आहेत.

राहुलनं घेतला कुटुंबातील सदस्यांचा जीव?

घटनास्थळावर सापडलेल्या पुराव्यावरून संशयाची सुई मृत राहुलच्या दिशेने जात आहे. परंतु हे टोकाचं पाऊल राहुलनं का उचललं हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आई आणि ३ मुलांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आहेत. परंतु राहुलच्या मृतदेहावर कुठलेही निशाण नाही. त्याचा मृतदेह अंगणात लटकलेल्या अवस्थेत सापडला. आता राहुलचा मृत्यू कसा झाला यासाठी पोलीस पोस्टमोर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

सासरच्यांसोबत होता वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल आणि त्याच्या सासरच्या मंडळीसोबत काही कारणावरून वाद होता. राहुलच्या सासरची माणसं त्याचा मेव्हुणा त्याला खूप त्रास देत असल्याचं राहुलच्या बहिणींनी सांगितले. या बहिणींनी राहुलच्या मेहुण्यांवर हत्येचा आरोप केला आहे. मात्र जर मेव्हुण्यांनी राहुलला मारलं असेल तर बहिण आणि तिच्या मुलांना कोणी मारलं? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ४ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ७ जणांचं पथक बनवण्यात आल्याची माहिती एसएसपी अजय कुमार यांनी दिली.

Web Title: Suspicious death of 5 members of the same family at Prayagraj UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.