भाजप खासदाराच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 01:18 PM2022-03-14T13:18:30+5:302022-03-14T13:24:46+5:30

Suspicious Death : भाजप खासदाराची चुलत सून प्रयागराजच्या काटजू भागात राहत होती.

Suspicious death of BJP MP's daughter-in-law, big revelation in postmortem | भाजप खासदाराच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा

भाजप खासदाराच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा

googlenewsNext

प्रयागराज - उत्तर प्रदेशमधील फुलपूर येथील भाजप खासदार केसरी देवी पटेल यांच्या चुलत सुनेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. भाजप खासदाराची चुलत सून प्रयागराजच्या काटजू भागात राहत होती.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे
पोलिसांनी खासदाराच्या सुनेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले आहे. भाजप खासदाराच्या चुलत सुनेचा सल्फा खाल्ल्याने मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झाले आहे.

मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा
भाजप खासदार केसरीदेवी पटेल यांच्या चुलत सुनेच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

नैराश्यात असायची सून 
ती सतत नैराश्यात जात होती, असा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या आत्महत्येमागे हे प्रमुख कारण असू शकते.

Web Title: Suspicious death of BJP MP's daughter-in-law, big revelation in postmortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.