३ कोटींना जमीन विकली, नवीन थार आणली; १० दिवसांनी त्याच कारमध्ये संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 01:22 PM2023-07-29T13:22:18+5:302023-07-29T13:22:53+5:30

पोलिसांच्या तपासात युवकाची ओळख आगरा येथील ताजगंज गावचा रहिवासी असल्याचे झाली. मृत युवकाचे नाव धर्मवीर यादव असे असून त्याचे वय २२ वर्ष आहे.

Suspicious death of Dharamveer Yadav, a young man from Uttar Pradesh, police investigation underway | ३ कोटींना जमीन विकली, नवीन थार आणली; १० दिवसांनी त्याच कारमध्ये संशयास्पद मृत्यू

३ कोटींना जमीन विकली, नवीन थार आणली; १० दिवसांनी त्याच कारमध्ये संशयास्पद मृत्यू

googlenewsNext

फिरोजाबाद – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील पिपरिया गावाजवळ एका थार वाहनात युवकाचा मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात खळबळ माजली. युवकाच्या मस्तकावर मधमोध गोळी मारण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी थार कारमध्ये युवकाचा मृतदेह सापडला. त्या कारला नंबर प्लेट नव्हता.

पोलिसांच्या तपासात युवकाची ओळख आगरा येथील ताजगंज गावचा रहिवासी असल्याचे झाली. मृत युवकाचे नाव धर्मवीर यादव असे असून त्याचे वय २२ वर्ष आहे. वडिलांचा एक वर्षापूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मृत युवकाचा चुलत भाऊ जितेंद्र यादवने सांगितले की, धर्मवीर काल संध्याकाळी घरातून निघाला होता. रात्री १० वाजता घरच्यांसोबत त्याचे बोलणे झाले तेव्हा तो खोलीत असल्याचे म्हणाला. मित्रांसोबत जातोय असं म्हटलं. धर्मवीरने २ महिन्यापूर्वी ३ कोटी रुपयांची जमीन विकली होती. त्याचे वडील सावकार होते. वडिलांनंतर तोच घरची जबाबदारी सांभाळत होता.

धर्मवीरला २ बहिणीही आहेत. मोठी बहिण उमाचे लग्न झाले आहे. तर लहान बहिण सध्या शिक्षण घेतेय. धर्मवीर हा आगरा पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याचसोबत तो कोचिंगही चालवायचा. १० दिवसापूर्वी त्याने महिंद्रा थार कार विकत घेतली. मात्र आज त्याचा त्याच कारमध्ये गोळी लागलेला मृतदेह सापडला. गावकऱ्यांच्या माहितीनंतर पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.

या घटनेनंतर शहर एसपी सर्वेश कुमार मिश्रा, सीओ टुंडला अनिवेश कुमार आणि स्टेशन प्रभारी किरपाल सिंह पोहोचले. आरोपींचा शोध सुरू करण्यात आल्याचे एसपी मिश्रा यांनी सांगितले. घटनेचा तपास करण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे असंही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Suspicious death of Dharamveer Yadav, a young man from Uttar Pradesh, police investigation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.