अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रुग्णालयात दाखल आजोबांच्या भेटीसाठी गेली, मग..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 06:58 AM2023-09-18T06:58:49+5:302023-09-18T06:59:27+5:30
नातेवाईकांचा डॉक्टरवर आरोप, इजेक्शननंतर झाला मृत्यू
नवी मुंबई : दिघा येथील १३ वर्षीय मुलीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या आजोबांना भेटण्यासाठी ती नातेवाइकांसोबत रुग्णालयात गेली होती. तिथून आल्यानंतर अचानक तिची प्रकृती खालावल्याने जवळच्याच दवाखान्यात नेले होते. तिथल्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिल्यानंतर अर्ध्या तासातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाइकांनी डॉक्टरवर हलगर्जीचा आरोप केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
प्रेरणा उमेश सोनवणे (१३) ते मृत मुलीचे नाव असून दिघा येथील पंढरी नगर परिसरात ही घटना घडली आहे. प्रेरणाचे आजोबा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे शनिवारी दुपारी सर्व नातेवाइकांसोबत प्रेरणा देखील रुग्णालयात गेली होती. मात्र, तिथून घरी आल्यानंतर तिला डोकेदुखी, उलटी व ताप सुरू झाला होता. यामुळे जवळच्याच डॉ. सिंग यांच्या दवाखान्यात तिला नेले होते.