महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:32 PM2020-08-11T21:32:22+5:302020-08-11T21:34:06+5:30
पैसे न मिळाल्याने हत्या केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
जम्मू शहरातील छन्नी हिम्मत भागात महिलेच्या संशयास्पद मृत्यूची घटना घडली आहे. या महिलेच्या पालकांनी सासरच्या लोकांवर खुनाचा आरोप केला आहे. मृत महिलेचे वडील अमेरिकेत आहेत. आपल्या मुलीकडून दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पैसे न मिळाल्याने हत्या केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मृत महिलेचा भाऊ अशोक मेहरा यांनी आपली बहीण जिया भारती नाराज आणि त्रस्त होती असल्याचा आरोप केला आहे. मृतदेहाची अवस्था पाहून हत्येचा गुन्हा असल्याचे दिसते. अशोकाने सांगितले की, बहिणीचा नवरा आणि सासऱ्याच्या चेहऱ्यावरही खुणा आहेत. त्यावरून बहिणीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्याने सांगितले की, सध्या वडील अमेरिकेत आहेत. सासरचे वडिलांना अमेरिकेत फोन करून त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करत होते. मृत महिलेला तीन वर्षाचे मूलही आहे. अमेरिकेतून फोनवर मृत महिलेच्या वडिलांनी सांगितले की, मुलीच्या सासर्याने फोन करून त्यांच्याकडे दहा लाख रुपये मागितले. पैसे न मिळाल्यामुळे ही घटना घडविण्यात आली आहे. त्याचबरोबर छन्नी हिम्मत पोलिसांच्या म्हणण्यानुसार शवविच्छेदन केले गेले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.
अन्य महत्वाच्या बातम्या...
६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार
दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू
IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही
सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
भावाची हत्या करून सासरवाडीत जाऊन लपला, चार आरोपी जेरबंद