पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीने गळा दाबून संपवले तिला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:05 PM2020-07-08T16:05:23+5:302020-07-08T16:07:18+5:30
या प्रकरणाचा तपास वणी पोलीस ठाण्यातील तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे यांनी केला होता.
वणी (यवतमाळ) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून ठार मारणाऱ्या आरोपीस पांढरकवडा येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश पी.बी.नाईकवाड यांनी बुधवारी जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. अनिल महादेव कुडमेथे (३२) असे आरोपी पतीचं नाव असून तो वणी तालुक्यातील पेटूर येथील रहिवासी आहे. १८ मार्च २०१७ रोजी आरोपी अनिल कुडमेथे याने त्याची पत्नी सुषमा (२५) हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा दाबून खून केला होता. याप्रकरणी आरोपी अनिले वडिल महादेव कुडमेथे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास वणी पोलीस ठाण्यातील तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे यांनी केला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा