माथेफिरु प्रियकर! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या अन् वडिलांवरही चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 04:37 PM2018-07-31T16:37:56+5:302018-07-31T16:38:43+5:30

येथील कसबे-सुकेणे येथे एकतर्फी प्रेमातून तरूणीची वडीलांसमवेत हत्या झाली असून हल्लेखोर युवक पोलिसांना शरण आला आहे.

Sweetheart lover! With the love of only one, the young woman was killed with knives and knives | माथेफिरु प्रियकर! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या अन् वडिलांवरही चाकूने वार

माथेफिरु प्रियकर! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या अन् वडिलांवरही चाकूने वार

Next

कसबे-सुकेणे (नाशिक) - येथील कसबे-सुकेणे येथे एकतर्फी प्रेमातून तरूणीची वडीलांसमवेत हत्या झाली असून हल्लेखोर युवक पोलिसांना शरण आला आहे. कसबे सुकेणे येथील राजवाडा भागात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मौजे सुकेणे येथील सुरज दिंगबर चव्हाण (28) हा कसबे सुकेणे येथील सोनाली उर्फ विद्या चंद्रकांत ढेंगळे या तरूणीवर एकतर्फी प्रेम करत होता. 

नाशिकमधील सातपूरच्या महिंद्रा आणि महिंदा कंपनीत हा युवक आणि युवती नोकरीस होते. आज मंगळवार सकाळी 11वाजता सुरज हा सोनालीच्या घरी गेला. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली व राग अनावर न झाल्याने सुरजने सोनालीच्या अंगावर चाकुने सपासप वार केले, अशी प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात सोनालीचा जागीच मृत्यू झाला. सोनालीला वाचविण्याच्या प्रयत्नात तिचे वडीलही गंभीर जखमी झाले असून त्यांना कसबे सुकेणेच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनाली रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्ल्याची माहिती गावभर पसरताच गावात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. तर राजवाड्यापासून जवळच असलेल्या कसबे सुकेणे पोलीस उपठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.  दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी सुरज चव्हाण हा पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे समजते. एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यात गावातील तरूणीला जीवास मुकावे लागल्याने कसबे सुकेणे येथील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Sweetheart lover! With the love of only one, the young woman was killed with knives and knives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.