अर्जुन रामपालच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार?, एनसीबी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 07:33 PM2020-12-24T19:33:58+5:302020-12-24T19:34:30+5:30
Drug Case : अर्जुन रामपाल एनसीबीविरोधात दावा करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं आहे.
अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबी अटक करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. एनसीबीच्या छाप्यावेळी अर्जुनने प्रतिबंधित औषधांबाबत डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दाखवलं होतं. मात्र, ते प्रिस्क्रिप्शन जुनं असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे.
अर्जुन रामपालची पुन्हा सहा तास चौकशी, दिल्लीतील डॉक्टरांचा जबाब नोंदविला
दरम्यान, अर्जुन रामपाल एनसीबीविरोधात दावा करण्याच्या तयारीत असल्याचं समजतं आहे. आपल्या घरी सापडलेली दोन्ही औषधं डॉक्टरांनी दिलेली असल्याचा अर्जुनने दावा केला आहे. एनसीबीने छाप्यात आपल्या बहिणीची औषधे आणि कुत्र्याची औषधे जप्त केली असल्याचं अर्जुनने म्हटले आहे.
अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी करण्याची आली. ही चौकशी सुमारे सहा तास चालली. त्यामध्ये प्रामुख्याने रामपाल हा ड्रग्ज घेणारा ग्राहक आहे की ते पुरवणाऱ्या दलालांच्या टोळीतील सदस्य, याबाबत माहिती घेण्यात आली. या प्रकरणी अर्जुनला दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते, त्याला एनसीबीने २१ डिसेंबर रोजी समन्स बजावले होते. अर्जुन रामपालची १६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांची काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे एनसीबीने जप्त केली आणि फॉरेन्सिक्स तपासासाठी पाठविली होती. जप्त उपकरणातून तपास यंत्रणेला काही नवीन पुरावे मिळाल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून समोर आली आहे. त्यामुळे अर्जुन रामपालची अटक होऊ शकते, अशी माहिती झी २४ तासने दिली आहे.
अभिनेता अर्जुन रामपालची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सोमवारी दुसऱ्यांदा सहा तास कसून चौकशी केली. त्याला बंदी असलेले उत्तेजक औषध लिहून दिलेल्या दिल्लीतील संबंधित डॉक्टरांचा जबाब नोंदवून घेतला. बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने रामपाल व त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार पुन्हा चाैकशीसाठी बाेलावण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.