नाना पटोलेंविरोधात बदनामीकारक मेसेज करणाऱ्याच्याविरोधात ठोस कारवाई करा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 01:51 PM2021-12-11T13:51:47+5:302021-12-11T13:53:20+5:30

Nana Patole : नाना पटोले आणि माझ्या नावाची बदनामी करणारा मेसेज ज्याने सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या बाबत पोलिसांनी ठोस कासवाई करावी. अन्यथा पोलिस आयुक्त कार्यालय अथवा मानपाडा पोलिस स्टेशनसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे. 

Take concrete action against those who send defamatory messages against Nana Patole, otherwise ... | नाना पटोलेंविरोधात बदनामीकारक मेसेज करणाऱ्याच्याविरोधात ठोस कारवाई करा अन्यथा...

नाना पटोलेंविरोधात बदनामीकारक मेसेज करणाऱ्याच्याविरोधात ठोस कारवाई करा अन्यथा...

Next

कल्याण - घरे रजिस्ट्रेशन करण्याच्या नावाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने माजी नगरसेवकाने पैसे उकळल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. नाना पटोले आणि माझ्या नावाची बदनामी करणारा मेसेज ज्याने सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या बाबत पोलिसांनी ठोस कासवाई करावी. अन्यथा पोलिस आयुक्त कार्यालय अथवा मानपाडा पोलिस स्टेशनसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे. 

कल्याण डोंबिवलीतील 27 गावांमध्ये घरांची रजिस्ट्रेशन बंद आहे. या गावात बेकायदा बांधकामे झालेली आहे. या बेकायदा बांधकामे असलेल्या बेकायदेशीर घरांच्या खरेदी केल्यास सामान्य नागरीकांची आर्थिक फसवणूक होत आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी घरांचे रजिस्ट्रेशन बंद आहे. तरी देखील काही मंडळी घरांची नोंदणी करण्यासाठी टोकन देऊन नागरीकांकडून 70 ते दोन लाख रुपये घेत आहे असा गंभीर आरोप समाजिक कार्यकर्ते नरसिंग गायसमुद्रे यांनी केला. यात लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळींसह अधिकारी वर्ग लिप्त आहे.

या आरोपाची गंभीर दखल घेत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. कारण पाटील हे देखील कल्याण ग्रामीणचे आमदार आहे. जो कोणी या प्रकरणात असेल त्याचे नाव चौकशीतून समोर येईल यासाठी त्यांनी चौकशीची मागणी केली. ही पार्श्वभूमी असताना घरांच्या रजिस्ट्रेशनमध्ये माजी अपक्ष नगरसेवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने पैसे उकळत असल्याचा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल केला. या प्रकरणीशी काडी मात्र संबंध नाही. ज्या कोणी हा मेसेज व्हायरल करुन पटोलेसह माझी बदनामी केली आहे. त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मेसेज व्हायरल करणा:याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. अन्यथा बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा पाटील यांनी काल दिला आहे. 

Web Title: Take concrete action against those who send defamatory messages against Nana Patole, otherwise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.