"दंडाची रक्कम घेऊन कोर्टात पोहचा"; चक्क मृत व्यक्तीलाच दिली पोलिसांनी नोटीस

By पूनम अपराज | Published: February 1, 2021 04:58 PM2021-02-01T16:58:23+5:302021-02-01T17:00:05+5:30

Crime News : या नोटिशीत नऊ जणांच्या नावाचा समावेश होता. राम आसरे, नरेश, हरिश्चंद्र, रती सिंह, राघवेंद्र, सतीश, गुड्डू, लवकुश आणि अशोक यांची नाव नोटिशीत आहेत. 

"Take the fine and go to court"; The police gave notice to the dead person | "दंडाची रक्कम घेऊन कोर्टात पोहचा"; चक्क मृत व्यक्तीलाच दिली पोलिसांनी नोटीस

"दंडाची रक्कम घेऊन कोर्टात पोहचा"; चक्क मृत व्यक्तीलाच दिली पोलिसांनी नोटीस

Next
ठळक मुद्देनोटीसमध्ये नाव लिहिलेल्या सर्व व्यक्तींनी  प्रत्येकी ५० हजारांची जामिनाची रक्कम प्रतिज्ञापत्र घेऊन उपजिल्हा मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात पोलीस आपल्या वेगळ्याच कारनाम्यामुळे चर्चेत आहेत. येथे पोलिसांना जिवंत व्यक्तींप्रमाणे मृत व्यक्तीची देखील शांती भंग करेल म्हणून दहशत वाटते. म्हणून येथील पोलिसांनी अशा एका व्यक्तीला शांती भंग केल्याच्या कलमान्वये नोटीस पाठवली आहे आणि त्याला मॅजिस्ट्रेटसमोर हजार राहण्याचे आदेश दिले आहेत, जी व्यक्ती तीन वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे. 

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडे कारवाई करण्यासाठी अनेक प्रकरण समोर येतात. मात्र, ह्यावेळी गावात झालेल्या क्षुल्लक वादविवादानंतर मृत व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांना केलेल्या हलगर्जीपणाबाबत उत्तर मागितले आहे. 

हरदोई जिल्ह्यातील बघौली पोलीस ठाणे यावेळी चर्चेत आहे. या पोलीस ठाण्याने एका अशा व्यक्तीला शांती भंगाबाबत नोटीस पाठवली आहे, ज्या व्यक्तीचं तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पोलिसांनी दंड भरण्यासाठी त्याला मॅजिस्ट्रेटसमोर हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली. बघौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत निभि गावात राहणारे राम आसरे यांच्या घरी पोलिसांनी नोटीस धाडली. या नोटिशीत नऊ जणांच्या नावाचा समावेश होता. राम आसरे, नरेश, हरिश्चंद्र, रती सिंह, राघवेंद्र, सतीश, गुड्डू, लवकुश आणि अशोक यांची नाव नोटिशीत आहेत. 

नोटीसमध्ये नाव लिहिलेल्या सर्व व्यक्तींनी  प्रत्येकी ५० हजारांची जामिनाची रक्कम प्रतिज्ञापत्र घेऊन उपजिल्हा मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. नोटीस मिळताच कुटुंबातील लोकं अचंबित झाले, कारण नोटीसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर लिहिलेल्या नावाची व्यक्ती (हरिश्चंद्र) ३ वर्षांपूर्वी मृत पावली आहे. आता नोटीस मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्य हैराण झाले की, ३ वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीला उपजिल्हा अधिकारीच्या कोर्टात कसं हजर करायचं. बघौली पोलीस ठाण्याचा हलगर्जीपणा जेव्हा समोर आला, तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आले. दरम्यान पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेऊन प्रभारी पोलीस निरीक्षकास याबाबत स्पष्टीकरण मागितले. 

पोलिस राखणार सामाजिक बांधिलकी; ठाणे वाहतूक शाखेतर्फे रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर

 

हरदोई पोलीस ठाण्याचे एएसपी अनिल कुमार यांचं म्हणणं आहे की, बघौलीच्या निभी गावातील राम आसरे आणि रविशंकर यांचं भांडण झालं, त्यावरून पोलिसांनी ९ जणांवर चलान फाडले. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Web Title: "Take the fine and go to court"; The police gave notice to the dead person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.