पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:52 PM2020-06-11T18:52:53+5:302020-06-11T20:04:03+5:30
जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.
लुधियाना - भावाला अटक केल्याने एका तरूणाने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने बस्ती जोधेवालच्या कृ्ष्णा कॉलनी परिसरातील एका क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विषजन्य पदार्थ मिसळला. जेणेकरून हे पाणी पिऊन तेथील शिपाई, अन्य कर्मचारी आणि रुग्णांचा मृत्यू होईल, असा कट त्याने आखला.
जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. बस्ती जोधेवाल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शिपाई असलेल्या गुरपिंदर सिंग यांच्या तक्रारीवरून कृ्ष्णा कॉलनी येथे राहणारा वरिंदर उर्फ नितीका खुंसी आणि चूहड़पुर गावात राहणार त्याचा साथीदार गौरव आणि त्याची बहीण सिमरनविरुद्ध हत्येचा कट रचल्याप्रकरणात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणात आरोपीला अटक केली आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आले. येथून या तिघांनाही एक दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला आहे. पोलीस आरोपींकडे चौकशी करत आहेत. तपास अधिकारी एएसआय राधेश्याम यांनी सांगितले की, आरोपी वरिंदरचा भाऊ जतिंदर सिंग यांच्या विरोधात लुटमारी आणि लुटमारीचा कट रचणे यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी आरोपी जतिंदरला याआधी अटक केली होती. यावेळी या तपास पथकात शिपाई गुरपिंदर सिंग यांचा समावेश होता. त्याचा बदला घेण्यासाठी जतिंदरचा भाऊ वरिंदर याने गुरपिंदरविरोधात कट रचला. गुरपिंदर हे कृष्णा कॉलनीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्तव्यावर कार्यरत होते. त्यामुळे त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने क्वारंटाईन सेंटरमधील दाखल असलेल्या रुग्णांनाही सोडणार नाही असे ठरवले आणि पाण्याच्या टाकीत विषजन्य पदार्थ मिसळला.
ज्यावेळी पोलीस शिपाई गुरपिंदर सिंग पाणी पिण्यासाठी तेथे आले तेव्हा टाकीतून वेगळाच वास येत होता. त्या वासामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली. यावेळी सोबतच्या कर्मचाऱ्यांना सांगितले तेव्हा कळाले आरोपी छतावर होते. यावेळी तपासादरम्यान आरोपींनी बदला घेण्यासाठी म्हणून या पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ मिसळला असल्याचं समोर आले. एएसआय राधेश्याम यांनी आरोपींना न्यायालयात सादर केल्यानंतर पोलिस रिमांडमध्ये पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही
खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या