माहेरी पत्नी एकटीच असल्याचा घेतला फायदा, पतीने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:04 PM2022-02-09T19:04:02+5:302022-02-09T19:05:17+5:30
Murder Case : घटनेनंतर फरार झालेल्या आराेपीच्या आवळल्या मुसक्या
लातूर : शहरातील अवंतीनगर भागात माहेरी राहणाऱ्या एका विवाहितेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आराेपी पतीला पाेलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविराेधात एमआयडीसी पाेलीस ठाण्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी याकूब इस्माईल शेख (४५ रा. अवंतीनगर,लातूर) यांची मुलगी रेश्मा (२२) हिचा गत तीन वर्षांपूर्वी लातुरातील इस्लामपुरा भागात राहणाऱ्या अब्दुल शेख (२४) याच्यासाेबत विवाह झाला हाेता. दरम्यान, काही दिवस मुलीला चांगले नांदविले. मात्र, सतत छळ हाेत असल्याने रेश्मा आपल्या आई-वडिलांकडे माहेरी आवंतीनगर येथे सध्याला वास्तव्याला हाेती. दाेघांना एक दाेन वर्षाचे मूल आहे. कुठल्या ना कुठल्या कारणावरुन रेश्मा आणि अब्दुलमध्ये सतत भांडण-तंटा व्हायचा...यावर मुलीच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी अनेकदा समजावून सांगितले हाेते. मात्र, यातून जावई अब्दुलमध्ये फरक पडला नाही. अखेर छळाला कंटाळलेली रेश्मा माहेरी राहत हाेती.
प्रेमाला धर्म नसतो! धर्माच्या बेड्या झुगारून डॅडीने झुबेदा मुजावर यांच्यासोबत केलं होतं लग्न
मेहुणीशी लग्न करण्यासाठी सुपारी देऊन पतीने पत्नीची केली हत्या, नराधमाने मृतदेहावर बलात्कार
गत तीन वर्षात अब्दुल हा सतत जीवे मारण्याच्या धमक्या पत्नी आणि सासू-सासऱ्यास देत हाेता. याबबात त्यांनी पाेलिसातही धाव घेत तक्रार दाखल केली हाेती. अखेर मंगळवारी मयत रेश्माची आई बाहेर गेली हाेती. तर वडील हे मजुरीसाठी बाहेरगावी गेले हाेते. माहेरी रेश्मा एकटीच असल्याची माहिती मिळवून, जावई अब्दुल हा रेश्माकडे आला. त्याने धारदार शस्त्राने तिची गळा चिरून हत्या केली आणि ताे फरार झाला. दरम्यान, झाेपेतून उठलेला दाेन वर्षाचा मुलगा आई का उठत नाही, म्हणून रडत घराबाहेर आला. यावेळी शेजाऱ्यांना शंका आल्याने घरात डाेकावून पाहिले असता रक्ताच्या थाराेळ्यात रेश्माचा मृतदेह पडल्याचे आढळून आले.
याबाबत मयत रेश्माचे वडील याकूब इस्माईल शेख यांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी घटनेनंतर फरार झालेल्या पती अब्दुल शेख (२४) याला ताब्यात घेतले आहे, असे तपासाधिकारी पाेलीस उपनिरीक्षक आर.ए.लाेखंडे यांनी सांगितले.