गर्भपाताची गोळी खाणं ठरलं जीवघेणं, अल्पवयीन मुलीचा झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:16 IST2022-07-01T19:15:09+5:302022-07-01T19:16:42+5:30
Death Due To Abortion Pills : मुलीला गरोदर करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. एस. मुरुगन (२७) असे युवकाचे नाव आहे.

गर्भपाताची गोळी खाणं ठरलं जीवघेणं, अल्पवयीन मुलीचा झाला मृत्यू
तामिळनाडूमध्ये बोगस डॉक्टराकडून गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील चेंगमजवळ ही घटना घडली. मुलीला गरोदर करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. एस. मुरुगन (२७) असे युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस. मुरुगन हा नेहमी मुलीला शाळेत सोडत असे. यादरम्यान दोघांमध्ये नाते निर्माण झाले. मुलगी अलिकडेच गरोदर राहिली होती. मुलगी गरोदर राहिल्यानंतर मुरुगनने मित्राच्या मदतीने डॉक्टरकडून गर्भपाताच्या गोळ्या विकत घेतल्या होत्या.
मुरुगनने मुलीला शाळेत नेण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन गेला आणि जाताना गर्भपाताची गोळी दिली. गोळी खाऊन दोघेही शाळेत जात होते. त्यावेळी मुलगी अचानक बेशुद्ध होऊन पडली. घाईघाईत मुरुगनने मुलीला सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर मृतदेह तिरुवन्नमलाई येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलीला गर्भपाताची गोळी देणाऱ्या डॉक्टरचाही पोलीस शोध घेत आहे.