भांडण सोडविण्यासाठी पुढाकार घेणे महागात; तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना

By मनीषा म्हात्रे | Published: October 3, 2022 08:01 PM2022-10-03T20:01:37+5:302022-10-03T20:01:47+5:30

रविवारी रात्री एक ती दीडच्या सुमारास यादव हे महाराष्ट्र नगर येथून घरी जात असताना, मित्राच्या भांडणात मध्यस्थी घेतल्याच्या रागात आरोपींनी त्यांना वाटेत अडवून शिवीगाळ केली.  

Taking the initiative to resolve conflict is costly; An incident of attempted murder of a young man in mankhurd | भांडण सोडविण्यासाठी पुढाकार घेणे महागात; तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना

भांडण सोडविण्यासाठी पुढाकार घेणे महागात; तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना

googlenewsNext

मुंबई :  भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी घेतल्याच्या रागात तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना मानखुर्दमध्ये समोर आली. याप्रकरणी ट्रॉमबे पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द परिसरात राहणारे रमाकांत पतीराम यादव (३१) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रविवारी रात्री एक ती दीडच्या सुमारास यादव हे महाराष्ट्र नगर येथून घरी जात असताना, मित्राच्या भांडणात मध्यस्थी घेतल्याच्या रागात आरोपींनी त्यांना वाटेत अडवून शिवीगाळ केली.  

तसेच जवळील लोखंडी धारदार कोयत्याने व लाकडी बांबूने यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. तसेच जीवेठार मारण्याची धमकी देत दोघे पसार झाले. घटनेची वर्दी लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत यादव यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी फारुख आणि साखर शेखला अटक केली आहे. 

Web Title: Taking the initiative to resolve conflict is costly; An incident of attempted murder of a young man in mankhurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस