सातबारा, फेरफार नोंदीसाठी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यासह अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:32 PM2021-12-22T16:32:18+5:302021-12-22T16:34:01+5:30

Bribe Case : या कारवाईत सापळा पथकाने आरोपी शशिकांत मधुकर पडवळे वय- ५१ वर्षे , मंडळ अधिकारी, वसई, विलास धर्मा करे-पाटील वय - ३९  वर्षे, तलाठी, सजा- ससूनवघर , वसई आणि  प्रविण छबुलाल माळी वय - ४३ वर्षे (खाजगी इसम) अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Talathi and officer arrested while accepting a bribe of Rs 45,000 for registration of satbara | सातबारा, फेरफार नोंदीसाठी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यासह अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक

सातबारा, फेरफार नोंदीसाठी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यासह अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक

googlenewsNext

आशिष राणे 

वसई तालुक्यातील महसूल विभागात कार्यरत वसई मंडळ अधिकारी व त्यांचे ससूनवघर  गावचे तलाठी तात्या या दोघांना त्यांच्या खाजगी इसमासाहित ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार २१ डिसेंबरच्या  रात्री ७ च्या सुमारास पीडित तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

या कारवाईत सापळा पथकाने आरोपी शशिकांत मधुकर पडवळे वय- ५१ वर्षे , मंडळ अधिकारी, वसई, विलास धर्मा करे-पाटील वय - ३९  वर्षे, तलाठी, सजा- ससूनवघर , वसई आणि  प्रविण छबुलाल माळी वय - ४३ वर्षे (खाजगी इसम) अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससुनवघर गावात राहणाऱ्या  २३ वर्षीय पीडित तक्रारदार तरुणाने आपल्या नावे सात बारा व फेरफार नोंद प्रक्रियेसाठी ससूनवघर तलाठी कार्यालयात अर्ज केला होता तर या कामांसाठी त्याच्याजवळ सुरुवातीला १ लाख २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती 

तर पुढे तडजोड करत ७० हजार देण्यास सांगितले आणि अखेर मंगळवारी तडजोडी अंती आरोपी मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांस २० हजार रुपये व तलाठी करे पाटील याने २५ हजार रुपये असे दोघांनी मिळुन ४५ हजार रुपयांची  लाच स्वीकारताना या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ केली अटक केली आहे व पुढील गुन्हा नोंद संदर्भातील कारवाई सुरू असल्याचे सांगितले 

या एकुणच सापळा पथकाच्या कारवाईत पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली  उपअधीक्षक ठाणे अश्विनी संतोष पाटील यांच्या सोबत  सपोफौ.सोंडकर,पोहवा.महाडिक , पोना.पाटील, मपोना.शिंदे, आणि चापोहवा.कदम आदींचा समावेश होता

Web Title: Talathi and officer arrested while accepting a bribe of Rs 45,000 for registration of satbara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.