तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक; सोशल मिडियावर करत होता फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:30 PM2021-06-16T21:30:01+5:302021-06-16T21:33:06+5:30

Talibani Terrorist : अतिरेकी असल्याचा संशय, अफगानी नागरिक, ११ वर्षांपासून छुपे वास्तव्य, शरिरावर मिळाली बंदुकीच्या गोळीची जखम 

Talibani terrorist supporter arrested; Follow on social media | तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक; सोशल मिडियावर करत होता फॉलो

तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक; सोशल मिडियावर करत होता फॉलो

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांच्या भूवया उंचावल्या. आम्ही या संबंधाने चाैकशी करीत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले आहे.विशेष म्हणजे, आधी कंबल विकणाऱ्या मतिनने नंतर नागपुरात अवैध सावकारी सुरू केली.

नागपूर : तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता. त्याच्या शरिरावर बंदुकीच्या गोळीची जखम (व्रण) दिसून आल्याने तसेच तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मिडियावर फॉलो करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. महत्वाचे म्हणजे, नूरचा मतिन नामक साथीदार अचानक फरार झाल्यामुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाले आहे.

त्याचमुळे तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. नूर मोहम्मद (वय अंदाजे ३० वर्षे) असे नाव असलेला एक अफगानी नागरिक दिघोरी परिसरात राहतो. त्याचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनिय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी नूर मोहम्मदवर नजर ठेवली. सोशल मिडियावर तो तालिबानी अतिरेक्यांना फॉलो करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच विशेष शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी मंगळवारी नूर मोहम्मदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसेन्सही मिळाले. तो येथे २०१० पासून वास्तव्याला असल्याचे उघड झाले. नूर मोहम्मदच्या शरिरातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याचे निशान (व्रण) आहे. त्याच्या मोबाईलची पोलिसांनी तपासणी केली असता तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मिडियावर फॉलो करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांच्या भूवया उंचावल्या. आम्ही या संबंधाने चाैकशी करीत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले आहे.


मतीन फरार, संशय अधिक घट्ट

नूर मोहम्मद येथे मतिन नामक साथीदारासह राहत होता. हे दोघे २०१० मध्ये नागपुरात येण्यापूर्वी नूर मोहम्मद ज्या गावात राहत होता, ते गाव तालिबानी अतिरेक्यांचा गड मानले जाते. त्याच्या कुटुंबात तिकडे आईवडील आणि दोन भाऊ होते. त्यातील आईवडील आणि एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ बेपत्ता असल्याचे नूरने सांगितल्याचे समजते. नूरला पोलिसांनी पकडल्याचे लक्षात येताच मतिन फरार झाला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच वाढला आहे. हे दोघे नुसते तालिबानी समर्थक आहे की तालिबानी अतिरेकी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 

मतिन पळाला आसामकडे
विशेष म्हणजे, आधी कंबल विकणाऱ्या मतिनने नंतर नागपुरात अवैध सावकारी सुरू केली. त्यातून त्याने बनावट आधारकार्डसह अनेका कागदपत्रे जमविली. मोठी मालमत्ताही नागपुरात खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. फरार असलेल्या मतीनविरुद्ध २०१७ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. मतिन आसाम, मेघालयकडे पळून गेला असावा, असा पोलिसांना संशय असून, त्या राज्यातील तपास यंत्रणांना तशी माहिती देऊन त्याला पकडण्यासाठी पोलीस कामी लागले आहेत.


रेकीचा संशय, तपास यंत्रणा सरसावल्या

नागपूर शहर विविध दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर खूप वर्षांपासून आहे. येथे यापूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर, तब्बल ११ वर्षांपासून नागपुरात अवैध वास्तव्य करणाऱ्या नूर मोहम्मद आणि मतीनने नागपूरची रेकी करून तालिबानी अतिरेक्यांना सोशल मिडियावर काही मटेरियल पाठवले का, असा संशय आहे. त्यामुळे आम्ही कसून चाैकशी करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले. नूरकडून कसलेही शस्त्र जप्त करण्यात आले नाही. मात्र, एक व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये सापडला. त्यामुळे तो हिंसक वृत्तीचा असल्याचे लक्षात येते. या संबंधाने एटीएस, आयबीसह विविध तपास यंत्रणांनी नूर मोहम्मदची चाैकशी चालविली आहे.

Web Title: Talibani terrorist supporter arrested; Follow on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.