जुहूत फ्लॅट देतो सांगून अभिनेत्याला दलालांनी लावला दीड कोटींचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 01:18 PM2018-12-03T13:18:55+5:302018-12-03T13:20:37+5:30
पोलिसांनी नायर व रवी किशनची तक्रार एकत्र करून कमला लॅण्ड मार्क ग्रुपच्या जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नायर प्रकरणी पोलिसांनी या तिघांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक केली असून तेव्हापासून ते तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
मुंबई - भोजपूरी सिनेजगतातील सुपरस्टार अभिनेता रवी किशन याला मुंबईतील जुहू परिसरात फ्लॅट देतो अशी बतावणी करून तीन दलालांनी दीड कोटींचा चुना लावला आहे. याबाबत रवी किशन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडब्ल्यू) तक्रार दाखल केली आहे.
मुंबई या मायानगरीत अनेक दिग्ग्ज अभिनेत्यांसह अभिनेत्रीची घरे जुहू परिसरात आहेत. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकाचे अशा दिग्गजांच्या परिसरात आपलंही घर असावं असं वाटत असतं. त्याचप्रमाणे भोजपूरी सुपरस्टार अभिनेता रवी किशन याला जुहू परिसरात फ्लॅट पाहिजे होता. तो फ्लॅट मिळवून देतो अशी बतावणी करून तीन दलालांनी दीड कोटीं रवी किशन यांच्याकडून घेऊन गंडा घातला आहे. याप्रकरणी रवी किशन यांनी पोलिसात तक्रार केली आहे.
रवी किशन यांनी जुहू हाय राईझ सोसायटीत फ्लॅट मिळविण्यासाठी कमला लॅण्ड मार्क ग्रुपचे जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यासोबत व्यवहार केला होता. रवी किशन यांनी फ्लॅटसाठी या तिघांना दीड कोटी रुपये दिले होते. मात्र, पैसे घेऊनही फ्लॅट देत नसल्याने रवी किशन यांनी इओडब्ल्यूकडे तक्रार केली आहे. कमला लॅण्ड मार्क ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित रिअर इस्टेट कंपन्यांनी याअगोदर वर्सोवातील एक व्यावसायिक सुनील नायर यांची देखील साडे सहा कोटींची फसवणूक केली आहे. पोलिसांनी नायर व रवी किशनची तक्रार एकत्र करून कमला लॅण्ड मार्क ग्रुपच्या जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नायर प्रकरणी पोलिसांनी या तिघांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक केली असून तेव्हापासून ते तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
मुंबई - भोजपूरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार रवी किशन याला मुंबईतील जुहू भागात फ्लॅट मिळवून देतो असे सांगत तीन दलालांनी दीड कोटींना फसवले. pic.twitter.com/ohJvjIYxRZ
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 3, 2018