तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 06:24 AM2024-10-20T06:24:46+5:302024-10-20T06:25:44+5:30

ललित टेकचंदानी याच्या सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू केले होते.

Taloja Housing Project: Builder to return property to Tekchandani; Notice issued by 'ED' | तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस

तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नवी मुंबईमधील तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पात सर्वसामान्य लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासक ललित टेकचंदानी याची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ‘ईडी’ने त्याला नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. एखादी मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याविरोधात अपील करण्यासाठी काही मुदत देण्यात येते. या मुदतीदरम्यान जर संबंधित व्यक्तीचे अपील मान्य केले गेले तर त्याची मालमत्ता जप्त होत नाही. मात्र, मुदतीचा कालावधी उलटून गेल्यानंतर ‘ईडी’ने ही नोटीस जारी केली आहे.

नवी मुंबईमधील तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पात सर्वसामान्य लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासक ललित टेकचंदानीची आतापर्यंत एकूण ४३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर साडेसत्तावीस लाखांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. 

४०० कोटी जमवले

ललित टेकचंदानी याच्या सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू केले होते. या प्रकल्पात घरे घेऊ इच्छिणाऱ्या १७०० लोकांकडून एकूण ४०० कोटी रुपये जमा केले होते. मात्र, या प्रकल्पाला बराच विलंब झाला. तसेच टेकचंदानी याने लोकांना पैसेही परत केले नाहीत. 

अपहाराचा आरोप

सर्वसामान्य लोकांकडून जमा केलेल्या रकमेचा अपहार करत ती वैयक्तिक लाभासाठी वापरल्याचा ठपका ‘ईडी’ने त्याच्यावर ठेवला आहे. एका रहिवाशाने टेकचंदानी याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Web Title: Taloja Housing Project: Builder to return property to Tekchandani; Notice issued by 'ED'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.