न्यूड फोटो काढून स्वतःच्या पत्नीला धमकावले; आरोपी पतीला अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 01:06 PM2022-02-28T13:06:42+5:302022-02-28T13:07:23+5:30
Crime News : आधी पत्नीचे न्यूड फोटो काढले आणि नंतर या फोटोला शस्त्र बनवून तिच्यावर अत्याचार केला.
नवी दिल्ली : पती-पत्नीचे (Husband-wife relation) नाते हे विश्वासावर आधारित असते, पण जेव्हा विश्वासाला तडा जातो, तेव्हा हे नाते संपण्याच्या मार्गावर असते. दरम्यान, एखादा पती स्वतःच्या पत्नीचे न्यूड फोटो काढून तिला ब्लॅकमेल करेल, याबाबत कोण विचार करू शकेल का? पण असे एक प्रकरण समोर आले आहे.
तामिळनाडूतील (Tamil Nadu) एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचे न्यूड फोटो काढले आणि हुंड्यासाठी तिचा छळ केलाच पण तिला मारहाणही केली, त्यामुळे महिलेला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. हे प्रकरण तामिळनाडूच्या कोईम्बतूर (Coimbatore) जिल्ह्यातील आहे. याठिकाणी एका 32 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला पत्नीचे अश्लील फोटो काढणे आणि धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या व्यक्तीने आधी पत्नीचे न्यूड फोटो काढले आणि नंतर या फोटोला शस्त्र बनवून तिच्यावर अत्याचार केला. हुंडा म्हणून तिच्याकडे घराची मागणी केली. घर न दिल्यास फोटो लीक करण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला एका खासगी बँकेत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आहे. दरम्यान, 29 ऑक्टोबर 2020 रोजी एका 27 वर्षीय महिलेने गांधीपुरम, फर्स्ट स्ट्रीट एक्स्टेंशन येथे राहणाऱ्या सी पिचाईमुथू (C Pitchaimuthu) या सॉफ्टवेअर इंजिनीअरशी लग्न केले.
याचबरोबर, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लग्नाच्यावेळी मुलीच्या वडिलांनी 51 साव्हरेन (7 ग्रॅमचे 1 साव्हरेन) सोने आणि 5 लाख रुपये रोख हुंडा म्हणून मुलाला दिले होते. तसेच, लग्नानंतर पती आपल्या पत्नीला म्हणाला, तुझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, त्यामुळे तू माझी जीवनसाथी होऊ शकत नाहीस. त्यानंतर पत्नीने हे पतीच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर पतीच्या कुटुंबीयांनी तिच्या वडिलांकडे हुंड्याच्या स्वरूपात घराची मागणी केली.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एके दिवशी पिचाईमुथूने बळजबरीने पत्नीचे न्यूड फोटो काढले आणि त्यानंतर तिचा छळ सुरू केला. हे फोटो लीक करण्याची धमकी देत हुंड्याची मागणी करू लागला. यादरम्यान पिचाईमुथूने तिचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पिचाईमुथूच्या कुटुंबीयांनी शनिवारी तिला जबर मारहाण केली. त्यानंतर तिला कोईम्बतूर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. यानंतर पिचाईमुथूला पोलिसांनी अटक केली आहे.