ट्रान्सजेंडर महिलेच्या रूपात जीवन जगण्याची १९ वर्षीय मुलाची होती इच्छा, आईने दिला त्याला वेदनादायी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 03:44 PM2021-12-21T15:44:12+5:302021-12-21T15:44:22+5:30

Tamilnadu Crime News : खळबळ उडवून देणारी ही घटना अम्मापालयमच्या कन्नगी स्ट्रीटची आहे. इथे ४५ वर्षीय उमादेवी आपल्या पतीपासून वेगळी होऊन एकटी राहत होती.

Tamil nadu : Salem woman arrested for killing her son who was trying be transwoman | ट्रान्सजेंडर महिलेच्या रूपात जीवन जगण्याची १९ वर्षीय मुलाची होती इच्छा, आईने दिला त्याला वेदनादायी मृत्यू

ट्रान्सजेंडर महिलेच्या रूपात जीवन जगण्याची १९ वर्षीय मुलाची होती इच्छा, आईने दिला त्याला वेदनादायी मृत्यू

Next

Tamilnadu Crime News : ट्रान्सजेंडर महिला म्हणून जीवन जगण्याची इच्छा ठेवणाऱ्या १९ वर्षीय मुलाची त्याच्याच आईने हत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमधून समोर आली आहे. तामिळनाडूतील सलेम पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून आईसोबत आणखी आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. मृत तरूणाचं नाव नवीन होतं. जे बदलून त्याने अक्षिता ठेवलं होतं.

खळबळ उडवून देणारी ही घटना अम्मापालयमच्या कन्नगी स्ट्रीटची आहे. इथे ४५ वर्षीय उमादेवी आपल्या पतीपासून वेगळी होऊन एकटी राहत होती. तिचा मुलगी नवीन कुमारने इच्छेनुसार ट्रान्सवुमन बनण्याची तयारी सुरू केली होती. ट्रान्सजेंडर बनण्याच्या प्रयत्नात नवीनने आपलं नाव बदलून अक्षिता ठेवलं होतं. तो बंगळुरूमधील ट्रान्सजेंडर सुमदायातील सदस्यांसोबत राहत होता. 

नवीन नेहमीच आईच्या भेटीसाठी जात-येत होता. उमादेवीने मुलाला ट्रान्सवुमन न बनण्याचा सल्ला दिला होता. त्याने आईचं ऐकलं नाही म्हणून आईने इतर पाच लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. गेल्या आठवड्यात गंभीरपणे जखमी नवीनला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नंतर पोलिसांना चौकशीनंतर समजलं की, नवीनची हत्या त्याची आई उमादेवीनेच केली. पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की, उमादेवीने पुरूष बनून राहण्यासाठी नवीनला हार्मोन्स घेण्यासाठी भाग पाडलं होतं आणि जेव्हा नवीन यासाठी तयार झाला नाही तेव्हा उमादेवीने तिच्या साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला.
 

Web Title: Tamil nadu : Salem woman arrested for killing her son who was trying be transwoman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.