वडिलांच्या गर्लफ्रेंडचा मुलावर क्रूर अत्याचार, हात-पाय, पाठ अणि प्रायव्हेट पार्टच्या भागात दिले चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 11:28 IST2021-09-01T11:24:43+5:302021-09-01T11:28:18+5:30
संबंधित 8 वर्षांचा मुलगा गेल्या मंगळवारी मवशीच्या घरी पळून गेला होता. मुलाला अचानक पाहून मावशीलाही आश्चर्य वाटले. यानंतर, मावशीने जेव्हा मुलाच्या हाता-पायांवर, पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टच्या भागांत भाजल्याच्या खुणा पाहिल्या, तेव्हा तर त्यांना धक्काच बसला.

वडिलांच्या गर्लफ्रेंडचा मुलावर क्रूर अत्याचार, हात-पाय, पाठ अणि प्रायव्हेट पार्टच्या भागात दिले चटके
वेल्लोर - सावत्र आईने मुलाचा छळ केला... अशा आशयाचे अनेक किस्से आपण आजवर ऐकले असतील. मात्र, आता वडिलांच्या गर्लफ्रेंडने मुलावर क्रूर अत्याचार केल्याचे, त्याचा छळ केल्याचे वृत्त समोर आले आहे. ही धक्कादायक घटना तामिळनाडूतील वेल्लोर येथे घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या प्रियकराच्या 8 वर्षांच्या मुलावर अत्यंत क्रूर अत्याचार केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाच्या हात, पाय, पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टच्या भागात चटके दिल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. (Tamilnadu vellore fathers girlfriend showed cruelty burnt the child's back and private part)
मुलाच्या आईने केली होती आत्महत्या -
मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय सेत्तूचे ईश्वरी नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. दोघांना दोन मुले आहेत. एक मूलगा 8 वर्षांचा तर दसुरा मलगा 10 वर्षांचा आहे. चार महिन्यांपूर्वी ईश्वरीने आत्महत्या केली, त्यानंतर सेत्तू शेजारी राहणाऱ्या वेणी नावाच्या महिलेशी संबंध ठेवू लागला. वेणी मुलांना मारहाणही करायची.
"आज तुम्हाला संपवतोच"; सासऱ्यानं जावयावर पिस्तूल रोखली, तितक्यात...
मावशीच्या घरी पळून गेला होता मुलगा -
संबंधित 8 वर्षांचा मुलगा गेल्या मंगळवारी मवशीच्या घरी पळून गेला होता. मुलाला अचानक पाहून मावशीलाही आश्चर्य वाटले. यानंतर, मावशीने जेव्हा मुलाच्या हाता-पायांवर, पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टच्या भागांत भाजल्याच्या खुणा पाहिल्या, तेव्हा तर त्यांना धक्काच बसला. यावर, महिलेने मुलासह थेट गुडियाथम पोलीस ठाणे गाठले आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या सांगण्याप्रमाणे तक्रार नोंदविली.
यासंदर्भात पोलीस चौकशी करत आहेत. अशा घटना नेहमीच समोर येत असतात. मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र, तरीही मुलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येतातच.