तंत्र-मंत्रानं युवतीच्या मृतदेहाला जिवंत करण्याचा प्रयत्न; दुर्गंध पसरल्यामुळे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 04:59 PM2022-06-29T16:59:53+5:302022-06-29T17:07:36+5:30

Superstition Case : घरातील सदस्य गंगाजल पाजून आणि तंत्र-मंत्राने तिला बरे करण्याचा प्रयत्न करत होते.

Tantra-mantra attempts to alive the body of a young woman; The spread of the stench revealed the nature of witchcraft | तंत्र-मंत्रानं युवतीच्या मृतदेहाला जिवंत करण्याचा प्रयत्न; दुर्गंध पसरल्यामुळे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

तंत्र-मंत्रानं युवतीच्या मृतदेहाला जिवंत करण्याचा प्रयत्न; दुर्गंध पसरल्यामुळे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे तंत्रमंत्राद्वारे मृत मुलीला जिवंत करण्याचा प्रयत्न केला जात होता. मृतदेहातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मृतदेह ५ दिवस घरात लपवून ठेवला होता आणि जादूटोणा केला जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या अल्पवयीन मुलीची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नसल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. घरातील सदस्य गंगाजल पाजून आणि तंत्र-मंत्राने तिला बरे करण्याचा प्रयत्न करत होते.

डीहा गावातील रहिवासी अभय राज यादव यांची 18 वर्षीय मुलगी अंतमा यादव हिचा पाच दिवसांपूर्वी गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. मात्र त्यांनी मुलीचा अंतिम संस्कार न करता तिला जिवंत करण्यासाठी तंत्राचा जप सुरू केला. देवी येईल आणि मुलगी पुन्हा जिवंत होईल असा त्यांचा विश्वास होता.

मृतदेहाचा दुर्गंध पसारल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितले असता घरच्यांनी विरोध केला. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला असता कुजलेला मृतदेह पाहून पोलिसांचीही तारांबळ उडाली. हे कुटुंबही मानसिक रुग्णांसारखे वावरत, कुजबुज करत, असे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. सध्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मुलीचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मृत मुलीची प्रकृती जवळपास महिनाभर खालावली होती. 24 जून रोजी त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. अंतीमाचा मृत्यू भूतामुळे झाल्याचा संशय कुटुंबीयांना होता. अशा स्थितीत ते तिला भूतबाधा आणि तंत्रमंत्राने जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते.

Web Title: Tantra-mantra attempts to alive the body of a young woman; The spread of the stench revealed the nature of witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.