विकृतीचा कळस! दैवी शक्तीच्या नावाखाली तांत्रिकाचा अल्पवयीनावर आईच्या समक्षच बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 02:23 PM2022-06-01T14:23:58+5:302022-06-01T14:24:39+5:30
घडलेल्या या प्रकारातून सुधारलेल्या समाजात लोक आजही अंधविश्वासाला बळी पडतात याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे.
म्हापसा: तुमच्या मुलीवर संकट आले आहे. आलेले संकट दूर करण्यासाठी, इच्छापुर्ती साठी तसेच तिला दैवीक शक्ती प्राप्त व्हावी यासाठी तिच्यासोबत शरीर घ्यावे लागेल, असे सांगून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलत्कार करण्याचा प्रकार उत्तर गोव्यातील कोलवाळ पोलीस स्तानकाच्या हद्दीत घडला आहे. या बलत्कारातील धक्कादायक घटना म्हणजे सदर प्रकार त्या पिडीत मुलीच्या आईच्या संम्मतीनेतिच्या समक्ष डोळ्यांदेखत घडला आहे. हा अत्यंत निंदनीय तसेच किळसवाणा प्रकार करणाऱ्या भोंदूसाधू किंवा तांत्रिक तसेच या कामात त्याला सहकार्य करणाऱ्या पिडीत मुलीच्या आईला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. तशी माहिती उपअधिक्षक जिबवा दळवी यांनी दिली.
घडलेल्या या प्रकारातून सुधारलेल्या समाजात लोक आजही अंधविश्वासाला बळी पडतात याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या प्रकारानंतर कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणातील संशयित स्वत:ला तांत्रिक म्हणवून घेणाऱ्या रमाकांत नाईक (५० कान्सा- थिवी) तसेच पिडीत मुलीच्या आईला ताब्यात घेतले आहे. आज बुधवारी संध्याकाळी दोघांनाही रिमांडासाठी न्यायालया समक्ष हजर केले जाणार आहे.
कोलवाळ निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार सोमवारी संध्याकाळच्या सुमाराला घडला. त्या पिडीत मुलीची आई सततपणे त्या तांत्रिकाकडेआपले विविध प्रश्न घेऊन जात होती. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्या आईनेआपल्या मुलीलाही सोबत नेले होते.
यावेळी त्या तांत्रिकानेमातेची दिशाभूल करताना मुलीवर विविध संकटे असल्याचे सांगून या संकटांचा नाश करण्यासाठी तिला दैवी शक्ती प्राप्त करुन देण्यासाठी शरीर सुख देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तांत्रिकाने केलेल्या सुचनेला आई बळी पडली व आपल्या पोटच्या मुलीला त्या तांत्रिकाकडे सुपूर्द करण्यास तयार झाली. त्यानंतर त्या आईच्या समक्षच तांत्रिकाने त्या पिडीत मुलीवर बलत्कार केला.
घडलेला किळसवाणा प्रकार नंतर दुसऱ्या दिवशी मुलीनेआपल्या वडिलांसमोर कथन केला. मुलीने सांगितलेल्या घटनेवर वडिलही आश्चर्यचकित झाले. त्यांनी लागलीच पोलिसात जाऊन या संबंधीत तक्रार दाखल केली. केलेली तक्रार पोलिसांनी भादंसच्या कलम ३७६, गोवा बाल कायदा २००३ च्या कलम ८ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ खाली नोंद करुन घेतला. तक्रारीनंतर पोलिसांनी त्या तांत्रिकाला तसेच पिडीत मुलीच्या आईला अटक केली आहे. पुढील तपास उपअधिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सोमनाथ माजीक यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक सोनम वेरेकर करीत आहे.