Tauktae Cyclone : पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर यल्लो गेट पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 03:14 PM2021-05-21T15:14:44+5:302021-05-21T15:16:26+5:30
Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाचा बॉम्बे हाय क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या बार्जना मोठा तडाखा बसला आणि मोठी मनुष्यहानी झाली आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी-३०५ या बार्जवरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी-३०५ बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा यल्लो गेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यल्लो गेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३०४(२),३३८,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Cyclone Tauktae: पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल pic.twitter.com/sFTX0UgweK
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021
पी-३०५ बार्जचा अपघात: चिंता, हुरहुर अन् अश्रू; आप्तांना शाेधण्यासाठी कुटुंबीयांची शवागृहाबाहेर गर्दी
तौक्ते चक्रीवादळाचा बॉम्बे हाय क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या बार्जना मोठा तडाखा बसला आणि मोठी मनुष्यहानी झाली आहे. वादळाच्या तडाख्यात पी-३०५ हा बार्ज बुडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ जणांचा शोध अद्याप सुरु आहे. ओएनजीसी कंपनीसाठी काम करणारे पी-३०५ हे बार्ज तौक्ते चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतरही समुद्रातच होते. १६ मे रोजी मध्यरात्रीनंतर बार्जचा नांगर तुटला. त्यानंतर १७ मे रोजी त्यांनी मुंबईच्या डिजिटल कम्युनिकेशन (डीजीसीओएम) केंद्राला नांगर तुटल्याबाबत माहिती दिली होती त्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले. तटरक्षक दल, भारतीय नौसेना यांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू केले आणि अडकलेल्या अनेकांचे जीव वाचवले.
पी-३०५ बार्जचा नांगर हा तौक्ते चक्रीवादळाच्या आधीच तुटला होता अशी माहिती मिळत आहे. मात्र, डीजीसीओएमने यासंदर्भात ओनजीसीचे प्रवक्ते हरीश अवल यांना कळवले असता त्यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. ऍफकॉन्सने त्यांची माणसे समुद्रात पाठवली होती अशी माहिती हरीश अवल यांनी दिली. ऍफकॉन्स ही कंपनी ओनजीसीसाठी काम करते. ऍफकॉन्सची माणसे त्या बार्जवर काम करत होती. मात्र ऍफकॉन्स आणि ओएनजीसी या दोन्ही कंपन्यांनी बार्जची मालकी असणारे डूरमास्ट एंटरप्राइजेज आणि बार्जच्या कॅप्टनला या घटनेसाठी जबाबदार धरले आहे.
Maharashtra | An FIR registered against Barge P305 Captain Rakesh Ballav & others for putting lives of workers in danger during the cyclone. Offense is registered under 304(2), 338, 34 IPC at Yellowgate Police Station on the complaint of barge engineer of P305: Mumbai Police
— ANI (@ANI) May 21, 2021
आतापर्यंत ओळख पटलेल्यांची नावे
नीलेश प्रकाश पितळे (वय ४५), जोमीश जोसेफ (३५), अमलराज बर्नाबस (४३), विशाल वसंत काठदरे (३५), नवीन कुमार (२९), गोलेख चंद्रा साहू (५२), ससिन इस्माईल (२८), सुशील कुमार (२३), प्रमोद पाठक (४५), मनप्रीत बलवंत सिंह (२६), पप्पुराम उदाराम (३२), योगेश गिर गोसावी, अजहर युनुस गडी (२५), मोहन वामसी कृष्णा (३३), अजय शिवप्रसाद सिंग (३९)