टीसीने केली महिलेची छेडछाड; दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 07:17 PM2019-03-04T19:17:36+5:302019-03-04T19:20:38+5:30

एकट्या प्रवास करणाऱ्या महिलेसमोर टिसीचे अश्लील चाळे; धावत्या चेन्नई एक्स्प्रेसमधील घटना

TC has strained woman; Filed in Dadar Railway Police Station | टीसीने केली महिलेची छेडछाड; दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

टीसीने केली महिलेची छेडछाड; दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देएक्स्प्रेसमध्ये एच. मीना नावाच्या टीसीने मध्यरात्री रेल्वे डब्यात एकटी महिला पाहून महिलेसमोर अश्लील चाळे करत अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. नंतर हा गुन्हा पुणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. 

मुंबई - लांब पल्ल्याच्या लोकलने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चेन्नईहून मुंबईला येत असणाऱ्या एकट्या महिलेला पाहून एक्स्प्रेसमधील कर्तव्यावर असलेल्या टीसीने महिलेसमोर अश्लिल चाळे करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी टीसीचं एच.मीना असं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. नंतर हा गुन्हा पुणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. 

 

ट्रेन क्रमांक १२१६४ चेन्नई-दादर एक्स्प्रेसमधून बुधवारी महिला मुंबईकडे रवाना झाली. एक्सप्रेसच्या एस ८ क्रमाकांच्या डब्यात महिला प्रवास करत होती. चेन्नईहून प्रवास सुरु करताना एस ८ डब्यामध्ये सहप्रवासी देखील होते. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे स्थानकात या डब्यातील सहप्रवासी उतरले. यावेळी महिला डब्यात एकटीच होती. पुणे स्थानक सोडून एक्स्प्रेस दादर दिशेने रवाना झाली. एक्स्प्रेसमध्ये एच. मीना नावाच्या टीसीने मध्यरात्री रेल्वे डब्यात एकटी महिला पाहून महिलेसमोर अश्लील चाळे करत अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या महिलेने नातेवाईकांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी रेल्वेच्या १८२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला आणि हकीकत सांगितली.

नियंत्रण कक्षातून चेन्नई एक्स्प्रेसमध्ये तैनात करण्यात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना तातडीने एस ८ क्रमांकाचा डब्याकडे जाण्याचे आदेश दिले. आरपीएफ जवानांनी लोणावळा स्थानकात टीसीचा शोध घेतला अखेर कल्याण स्थानकातून एक्स्प्रेस रवाना झाल्यानंतर आरपीएफ जवानांनी टीसीला ताब्यात घेतले. या प्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, गुन्हा पुणे ते लोणावळा दरम्यान घडल्याने प्रकरण पुणे रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणामुळे लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: TC has strained woman; Filed in Dadar Railway Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.