स्मार्टफोन नव्हता म्हणून शिक्षकाने संधी साधली; शाळेत बोलवत विद्यार्थींनीवर केला बलात्कार
By पूनम अपराज | Published: December 17, 2020 06:30 PM2020-12-17T18:30:59+5:302020-12-17T18:31:58+5:30
Rape :कोरोना महामारीत गरिबीची फायदा घेऊन तो त्यांना क्लासच्या बहाण्याने शाळेत एकटाच बोलवायचा, कारण या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन क्लासेससाठी स्मार्टफोन नव्हता.
तेलंगणातील प्राथमिक शाळेतील ४० वर्षीय शिक्षकाला पोलिसांनीअटक केली आहे. या नराधम शिक्षकावर असा आरोप केला जात आहे की, शिक्षक दुसरी, तिसरी आणि चौथीमध्ये शिकणार्या विद्यार्थिनींचे लैंगिक छळ करीत होता. कोरोना महामारीत गरिबीची फायदा घेऊन तो त्यांना क्लासच्या बहाण्याने शाळेत एकटाच बोलवायचा, कारण या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन क्लासेससाठी स्मार्टफोन नव्हता.
असा खुलासा केला?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी एक विद्यार्थिनी आजारी पडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले, तेव्हा ही बाब उघडकीस आली. यादरम्यान तिने आपल्या आईला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल सांगितले. या घटनेची माहिती समजल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मुलीच्या पालकांसह आरोपी शिक्षकाला मारहाण केली.
लॉकडाऊनदरम्यान लैंगिक छळ
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शाळेतील अन्य विद्यार्थ्यांकडे चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी असे आढळले की, 7 ते 11 वर्षे वयोगटातील 5 ते 6 विद्यार्थिनींनी शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे आढळले आहे. सध्या पीडित विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील दत्त म्हणाले की, "लॉकडाऊनदरम्यान त्याने पाच ते सहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. आम्ही त्याला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास करत आहोत."
कलम 376 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
आरोपी शिक्षक विद्यार्थिनींना अश्लील साहित्य दाखवत असे आणि त्याबद्दल बाहेर कुठेही तोंड न उघडण्याची धमकी देत होते. सध्या शिक्षकाविरूद्ध बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.