Bribe Case: लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी हॉटेलच्या टॉयलेटमध्ये घुसली टीम, आरोपीने हजारो रुपये केले फ्लश आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 01:04 PM2021-08-26T13:04:39+5:302021-08-26T13:06:08+5:30

Bribe Case, Crime News: दिल्लीतील अँटी करप्शन ब्रँचने दक्षिण दिल्लीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकून एक कोविड अधिकारी आणि एका सिव्हिल डिफेंस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

The team broke into the toilet of the hotel to catch the corrupt officer, the accused flushed thousands of rupees and ... | Bribe Case: लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी हॉटेलच्या टॉयलेटमध्ये घुसली टीम, आरोपीने हजारो रुपये केले फ्लश आणि...

Bribe Case: लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी हॉटेलच्या टॉयलेटमध्ये घुसली टीम, आरोपीने हजारो रुपये केले फ्लश आणि...

Next

नवी दिल्ली - दिल्लीतील अँटी करप्शन ब्रँचने दक्षिण दिल्लीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकून एक कोविड अधिकारी आणि एका सिव्हिल डिफेंस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. (Bribe Case) दरम्यान, ज्यावेळी अँटी करप्शन ब्रँचच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला तेव्हा लाचेच्या रकमेमधील ५० हजार रुपयांपैकी २५ हजार रुपये इम्रान खान याने टॉयलेटमध्ये प्लश केले. मात्र उर्वरित रक्कम फ्लश करण्यापूर्वीच त्याला टॉयलेटमधून अँटी करप्शन ब्रँचने त्याला पकडून लाचेची रक्कम जप्त केली. (The team broke into the toilet of the hotel to catch the corrupt officer, the accused flushed thousands of rupees)

सदर कोविड अधिकारी रवींद्र मेहरा हा पीतमपुरामध्ये केशव महाविद्यालयामध्ये लायब्रेरियन म्हणूव काम करतो. सध्या कोरोना काळात त्याची ड्युटी दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील कोविड अधिकारी म्हणून लागली होती. दरम्यान या अधिकाऱ्याने कोविड संदर्भातील दंडात्मक कारवाईची भीती दाखवून लाजपतनगरमधील सर्व स्पा मालकांना धमकावण्यास सुरुवात केली. तसेच सर्वांकडून तो दर महिन्याला एक लाख रुपये हप्ता देण्याची मागणी करू लागला.

दरम्यान याची तक्रार स्पा मालकांनी अँटी करप्शन ब्रँचकडे केली. त्यानंतर ट्रॅप लावून रवींद्र मेहरा आणि सिव्हिल डिफेंस अधिकारी इम्रान खान यांना हॉटेलमध्ये रंगेहात पकडण्यात आले.  

Web Title: The team broke into the toilet of the hotel to catch the corrupt officer, the accused flushed thousands of rupees and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.