हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 19:27 IST2020-05-12T19:22:54+5:302020-05-12T19:27:28+5:30
भाभार तालुक्यातील मेरा गावातले नागरिक रस्त्याने जात असताना एका चिमुरड्याचा मृतदेह आढळून त्यांना दिसला.

हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू
अहमदाबाद - बनासकाठा जिल्ह्यातील भाभर तालुक्यात मेरा गाव आहे. गावात हृदयद्रावक एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. मृत चिमुकल्याचा मृतदेह वाकून प्रणाम करताना आढळून आला आहे. या चिमुकल्याचा फोटो पाहून काळीज पिळवटून जाईल.
भाभार तालुक्यातील मेरा गावातले नागरिक रस्त्याने जात असताना एका चिमुरड्याचा मृतदेह आढळून त्यांना दिसला. कमरेतून वाकून चिमुकला वाकून जामिनाला चेहरा टेकून प्रणाम करताना हा मृतदेह रस्त्यावर बेवारस पडला होता. याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस
प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण केले; बसपाच्या माजी खासदाराला अटक
अचानक खात्यात लाखो रुपये आले; लोकांनी बँकेत जायचे सोडून पोलीस ठाणे गाठले
अंडा करीवरून पती-पत्नीत झालेले कडाक्याचे भांडण बेतले ३ वर्षाच्या मुलावर
गुजरात राज्यात कडाक्याचे ऊन असून तापमान ४५ डिग्री एवढे आहे. कडाक्याच्या उन्हात चिमुकल्याला रस्त्यामध्ये कोणीतरी सोडून गेले होतं. डोक्यावर कडक ऊन आणि सतत रडून रडून थकल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा फोटो पाहून अनेकांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.