यू-ट्यूबवरुन घेतलं बनावट नोट छपाईचं तंत्र; पोलिसांनी केलं 2 जणांना जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 02:29 PM2019-09-19T14:29:21+5:302019-09-19T14:29:35+5:30
एसटीएफने मुल्लांपुर पोलिसांच्या मदतीने याठिकाणी धाड टाकून प्रिंटर, बनावट नोटा बनविण्याचं सामान आणि कागद जप्त करण्यात आले.
लुधियाना - एसटीएफने बनावट नोटा छपाई करणाऱ्या दोन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 1 लाख 69 हजार रुपये जप्त केले. मुल्लांपुर येथील रकबा येथील गावात एका घरातील गच्चीवर हा गोरखधंदा सुरु होता. यू-ट्यूबवरुन बनावट नोटा छपाई करण्याचं तंत्र शिकून बनावट नोटा छपाई करण्याचं काम सुरु केलं. हे आरोपी खऱ्या नोटा घेऊन बनावट नोटा देण्याचं काम करत होते. या पैशातून ड्रग्स खरेदीविक्री काम सुरु होते.
एसटीएफने मुल्लांपुर पोलिसांच्या मदतीने याठिकाणी धाड टाकून प्रिंटर, बनावट नोटा बनविण्याचं सामान आणि कागद जप्त करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच एसटीएफने सतपाल सिंह उर्फ सत्ता याला एक किलो ग्राम हिरोईनसोबत पकडण्यात आलं. याच्या चौकशीतून समोर आलं की, बनावट नोटांच्या माध्यमातून ड्रग्स खरेदी केले जातात. त्यासाठी मुल्लांपुर येथील रकबा गावातील दोन युवकांपासून बनावट नोटा घेतल्या जातात. या चौकशीनंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा रकबा गावात धाड टाकली. त्यावेळी आरोपी हरविंदर सिंह हैरी आणि बलविंदर सिंह गैरी यांना ताब्यात घेण्यात आलं.
तपास अधिकारी अजायब सिंह यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी लहानपणापासून यूट्यूबवर बनावट नोटा बनविण्याचं तंत्र शिकत होते. बलविंदर गैरी दहावी आणि हरविंदर सिंह 12 वी पास आहे. दोघांकडेही काही काम नसल्याने त्यांनी यूट्यूबवरुन हे तंत्र आत्मसात केलं. मागील वर्षभरापासून हे काम सुरु केलं होतं. हा पैसा मार्केटमध्ये आणण्यासाठी त्यांना तस्करांना सोबत घेऊन पैसा बाजारात आणला.