आर्थिक तंगीमुळे जुळ्या मुलींना विकलं, सावत्र आईने बनवला होता प्लान; आरोपींना अटक...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 09:35 AM2023-01-26T09:35:37+5:302023-01-26T09:36:56+5:30
Crime News : जुळ्या मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या आईचं निधन झालं होतं आणि त्यांच्या वडिलाने दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नातून त्याना एक मुलगा आणि एक मुलगी झाली.
Crime News : तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे आर्थिक अडचणीमुळे आई-वडिलाने आपल्या दोन मुलींना लग्नाचं कारण देत विकलं. याप्रकरणी पोलिसांनी जुळ्या बहिणींच्या आई-वडिलांसहीत सात लोकांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जुळ्या बहिणी सुदूर गावातील आहेत.
जुळ्या मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या आईचं निधन झालं होतं आणि त्यांच्या वडिलाने दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नातून त्याना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. आता परिवारात मुलांची संख्या चार झाली. त्यांनी सांगितलं की, 'जेव्हा जुळ्या बहिणी 14 वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांच्या वडिलाने आणि सावत्र आईने आर्थिक तंगी दूर करण्यासाठी दोन्ही मुलींना विकण्याचा प्लान केला. यादरम्यान त्यांनी राजस्थानच्या शरमन आणि कृष्ण कुमार नावाच्या दोन व्यक्तींसोबत एका मुलीला 80 हजार रूपयात आणि दुसरीला 50 हजार रूपयात विकण्याचा सौदा केला'.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आई-वडिलांनी जुळ्या बहिणींना लग्नासाठी तयार केलं. लग्न हैद्राबादच्या बाहेर झालं. दोन्ही जोडप्यांनी आपला संसार सुरू केला. पण त्यांच्या वाद सुरू झाला जेव्हा त्यांना समजलं की, त्यांचे पती आधीच विवाहित आहेत आणि त्यांना मुलंही आहेत. तेव्हा जुळ्या बहिणींपैकी एक मुलगी आरोपीच्या घरातून पळून 16 जानेवारीला उग्रवई गावात पोहोचली.
यानंतर गावातील लोकांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (डीसीपीओ) श्रावंती यांना मुलीबाबत सूचना दिली. मुलीचा विचारपूस करण्यात आली. डीसीपीओनी सांगितलं की, 'आरोपींनी अल्पवयीन मुलीला शारीरिक आणि मानसिक रूपाने त्रास दिला. नंतर तिला समजलं की, पती विवाहित आहे आणि त्याला एक मुलगीही आहे. जेव्हा तिने पतीला आधीच्या लग्नाबाबत विचारलं तर तिला मारहाण करण्यात आळी आणि तिला घरातून बाहेर पाठवलं'.
अल्पवयीन मुलगी 100 रूपये घेऊन कामारेड्डीला पोहोचली. ती घाबरलेली होती. कुणीतरी काही खायला देईल म्हणून ती उग्रवाई गावातील मंदिरातच थांबली. डीसीपीओनी सांगितलं की, 'त्यांना समजलं की, पीडित मुलीच्या आणखी एका बहिणीला विकण्यात आलं होतं. तर तिलाही आम्ही आमच्याकडे आणलं. आता दोन्ही बहिणी आमच्या देखरेखीखाली आहेत. जर त्यांना पुढे शिकायचं असेल तर आम्ही त्यांना मदत करू'.