अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:08 PM2020-05-22T22:08:26+5:302020-05-22T22:10:10+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला अमृतसर येते क्वारंटाईम सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

A Telangana engineer who financed Al Qaeda was handed over to India pda | अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

Next
ठळक मुद्देइब्राहिम जुबैर मोहम्मद हा अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी आर्थिक व्यवहाराचे कामकाज पाहत होता. अमेरिकेच्या न्यायालयाकडून दहशतवादी कारवायांसाठी त्याला दोषी ठरवण्यात आलं.१९ मे रोजी या दहशतवाद्याला भारतात आणण्यात आलं.

नवी दिल्ली : तेलंगणातील ४० वर्षीय इंजिनिअरला अल कायदा या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याप्रकरणी अमेरिकेने दोषी ठरविले आहे. आता अमेरिकेकडून या कुख्यात दहशतवाद्याला भारताकडे सोपवण्यात आलं आहे. इब्राहिम जुबैर मोहम्मद असं या दहशतवाद्याचं नाव आहे. १९ मे रोजी या दहशतवाद्याला भारतात आणण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला अमृतसर येते क्वारंटाईम सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

इब्राहिम जुबैर मोहम्मद हा अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी आर्थिक व्यवहाराचे कामकाज पाहत होता. अमेरिकेच्या न्यायालयाकडून दहशतवादी कारवायांसाठी त्याला दोषी ठरवण्यात आलं. २०११ मध्ये इब्राहिम जुबैर याला अमेरिकेकडून अटक करण्यात आलं. मुळचा तेलंगणातील असणारा हा इब्राहिम एक इंजिनिअरही आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेमध्ये त्याने शिक्षा पूर्ण केली आहे. त्यानंतर आता त्याला भारताकडे सोपवण्यात आलं आहे.

अमेरिकेत इब्राहिमला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्याचा भाऊ याह्या मोहम्मद याला न्यायाधीशाला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याप्रकरणी २७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता भारतात इब्राहिमची चौकशी करण्यात येत असून देशातील दहशतवादी कारवायांशी त्याचा काही संबंध आहे का, याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू

 

विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न 

 

धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं

 

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

Web Title: A Telangana engineer who financed Al Qaeda was handed over to India pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.