Video: वडिलांसमोर मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याने थेट लग्नाचे फोटो पाठवले, नेमकं काय घडलं..?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 08:11 PM2022-12-20T20:11:34+5:302022-12-20T20:28:25+5:30
सीसीटीव्हीमध्ये काही लोक तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवताना दिसत आहेत.
सिरसिल्ला: तेलंगणामध्ये एका 18 वर्षीय मुलीचे तिच्या वडिलांसमोर चार जणांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांचे एक अजब विधान समोर आले आहे. याआधीही ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती, कदाचित त्यानेच तिला पळवून नेले असावे, असे विधान पोलिसांनी केले आहे.
#WATCH | Telangana: An 18-year-old girl was kidnapped in front of her father when they were returning to their house after visiting a temple, in the Sircilla district
— ANI (@ANI) December 20, 2022
(CCTV visuals) pic.twitter.com/GYedm9jkHJ
ही धक्कादायक घटना सिरसिल्ला जिल्ह्यातील आहे. सीसीटीव्हीमध्ये काही लोक तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवताना दिसत आहेत. मुलगी आणि तिचे वडील मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना अपहरणाची घटना घडली. ही घटना कधी घडली हे पोलिसांनी सांगितलेले नाही. यावेळी तरुणीचे वडील तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
अल्पवयीन असताना पळून गेली होती - पोलीस
वेमुलवाडा डीएसपी नागेंद्र चेरी म्हणाले - अपहरणात चार आरोपींचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वी मुलगी अल्पवयीन असताना तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. आता ती प्रौढ झाली आहे. अपहरणात तिच्या प्रियकराचा हात असावा. तोच तिला घेऊन गेल्याचा संशय आहे आरोपींना पकडण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आली आहेत.
या घटनेत फिल्मी ट्विस्ट
दरम्यान, या घटनेनंतर मुलीच्या घरच्यांना अपहरकर्त्या तरुणाने त्यांच्या मुलीसोबत लग्न केल्याचे व्हिडिओ आणि फोटो पाठवले. ज्या तरुणाने तिचे अपहरण केले, तो तिच्याच गावातील आहे. त्या दोघांची पूर्वी मैत्री होती. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात मुलीने सगळा खुलासा केला आहे.