धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 07:58 PM2020-05-19T19:58:32+5:302020-05-19T20:04:13+5:30
बेकायदेशीरपणे दोन महिलांना डांबून ठेवल्याप्रकरणी आणि अनेकदा त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे.
पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी एका मंदिरातील महंत आणि त्याच्या साथीदारांना बेकायदेशीरपणे दोन महिलांना डांबून ठेवल्याप्रकरणी आणि अनेकदा त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे.
अमृतसरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला सांगितले की, मुख्य आरोपीची महंत गिरधारी नाथ अशी ओळख पटली आहे. तो अमृतसरमधील लोपोके पोलिस स्टेशनअंतर्गत गुरू ज्ञान नाथ आश्रम वाल्मीकि तीर्थ येथे मुख्य महंत म्हणून कार्यरत होता. वरींदर नाथ असे दुसर्या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती महंत गिरधारी नाथ याची सहकारी आहे.
पीडितेने अनुसूचित जाती आयोगाकडे बाजू मांडली
पीडित महिलांनी पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य तरसेम सिंह यांना पत्राद्वारे कळविले होते की, त्यांना आश्रमात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आणि महंत वारंवार बलात्कार करत होता.
पोलिसांनी आश्रमात छापा टाकला
या माहितीवर तातडीने कार्यवाही करीत लोपोके पोलिसांनी सोमवारी आश्रम परिसरात छापा टाकला आणि पीडित महिलांना आश्रमातून मुक्त केले. पोलिसांनी घटनास्थळावरून महंत गिरधारी नाथ आणि त्याचा साथीदार वरिंदर नाथ यांना अटक केली. नछत्र सिंह आणि सूरज नाथ हे दोन लोक आश्रमातून पळून गेले असताना पोलिस आता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अटारीचे डीएसपी गुरू प्रताप सिंह म्हणाले की, “तरसेम सिंह सयालका यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही परिसरावर छापा टाकला आणि दोन आरोपींना अटक केली, जे पळून गेले आहेत त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, त्यांच्या शक्यतो लपलेल्या ठिकाणांवर पोलिस” हे छापे टाकत आहे."
पोलीस सध्या महंत गिरधारी नाथ आणि वरिंदर नाथ यांची चौकशी करत आहेत. या आश्रमात पूर्वी काय घडले याचा शोध पोलिस घेत आहेत. आश्रमातील कागदपत्रे आणि ये-जा करणाऱ्या लोकांच्या नोंदी पोलिस तपासून घेत आहेत.
मोठं यश! जम्मू - काश्मीरमध्ये गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरला केले ठार
मनरेगाच्या कामातून दुहेरी हत्येने खळबळ; 'समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आणि मुलाचा खून